Dayanand Gawade | लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

Dayanand Gawade | Deputy Superintendent of Police of Anti-Corruption Department Dayanand Gawade awarded President's Police Medal

पुणे : Dayanand Gawade |  लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांना राष्ट्रपतीचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. दयानंद गावडे हे मुळचे फलटण तालुक्यातील गुणवरे गावाचे रहिवासी. त्यांनी एम एस सी अ‍ॅग्री केल्यानंतर १९९६ मध्ये ते पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस सेवेत दाखल झाले. १९९७ ते २००९ पर्यंत त्यांनी पोलीस दलात सेवा केली. ते रायगड, सोलापूर, पुणे ग्रामीणमध्ये शिरुर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये २०२६ ते २०१९ पर्यंत कार्यरत होते. २०२० ते २०२३ पर्यंत रायगड जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी म्हणून काम केले. जून २०२३ पासून लाच लुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस उप अधिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

आपल्या २९ वर्षाच्या पोलीस खात्यातील सेवेमध्ये त्यांना ५ लाख ७५ हजार रुपयांची ११७० बक्षीसे मिळाली आहेत. पंढरपूर शहर व तालुका परिसरात काम करताना वारीचे योग्य नियोजन पार पाडले. पुणे व रायगड जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी म्हणून काम करत असताना ४४० फरारी आरोपी पकडून ४७ अवैध शस्त्रे पकडली आहेत. आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांची उकल करुन १५० पेक्षा अधिक आरोपींवर मोकाप्रमाणे कारवाई केली आहे.

२०२१ मध्ये एका फसवणुकीच्या गुन्ह्यातील फसवणूक केलेली ६५ लाखाची रोख रक्कम हस्तगत करून  पोलीस महासंचालक यांचे बेस्ट रिकव्हरी अवार्ड मिळवले आहे़ अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आलेल्या एका गुन्ह्याचा तपास करून २९२३ मध्ये आरोपीला जन्मठेप शिक्षा मिळवली आहे २००३ मध्ये एन एस जी सेंटर मनेसर हरियाणा येथे “पोलीस कमांडो इन्स्ट्रक्टर कोर्स – १८ मध्ये सहभागी होऊन तो कोर्स ‘अल्फा’ ग्रेट घेऊन पास केला आहे.

You may have missed