Pune Crime News | पुणे : मुंढव्यातील कार्यक्रमात DJ लावून रहिवाशांना त्रास देणाऱ्या वेस्टीन हॉटेलमधील इंव्हेंट मॅनेजरसह दोघांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | मुंढवा येथील वेस्टीन हॉटेल लॉनवर कार्यक्रमाचे आयोजन करुन त्या कार्यक्रमात डी जे लावून मोठ्या प्रमाणावर लाऊड स्पीकरचा वापर करुन स्थानिक रहिवाशांना त्रास देणार्या इव्हेंट मॅनेजर व साऊंड मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इव्हेंट मॅनेजर निलेश सुंदरराव नाईक Nilesh Sundarrao Naik (वय ३९, रा. गंगा आर्चिड, पिंगळे वस्ती, मुंढवा) आणि साऊंड मॅनेजर धनाजी मानिक राजगुरु Dhanaji Manik Rajguru (वय ३९, रा. ताडीवाला रोड) अशी गुन्हा दाखल करणार्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस अंमलदार अक्षय शिंदे यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २३ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता वेस्टीन हॉटेल लॉन येथे घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेस्टीन हॉटेल लॉनवर २३ जानेवारी रोजी सायंकाळी एका कंपनीचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन इव्हेंट मॅनेजर निलेश नाईक यांनी केले होते. या कार्यक्रमात बराच वेळ मोठ्या मोठ्या आवाजात साऊंड, डी जे चालू ठेवण्यात आला होता. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना कानठळ्या बसत होत्या. रात्री साडेनऊपर्यंत हा प्रकार सुरु होता. तेव्हा रहिवाशांनी पोलीस नियंत्रण कक्षाकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन डी जे बंद केला. या इव्हेंटसाठी कोणतीही पूर्व परवानगी न घेता कायदेशीर आदेशाची आवाज्ञा केल्यानेही दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार मुसळे तपास करीत आहेत.
