Pune Crime News | पूर्वीच्या वादातून चंदननगरमधील तरुणाचा वाघोलीत गळा चिरुन केला खून; वाघोली पोलिसांनी लातूरमधून पाच जणांना घेतले ताब्यात
पुणे : Pune Crime News | चंदननगरमध्ये रहात असताना तरुणाने मारहाण केल्याच्या रागातून पाच जणांनी वाघोलीमधील घरात शिरुन तरुणाच्या गळ्यावर वार करुन त्याचा निर्घुण खुन केला. वाघोली पोलिसांनी लातूर मधून अल्पवयीन मुलांसह ५ जणांना ताब्यात घेतले आहे.
विकी विजय दिवटे (वय २१, रा. आर पी एस हेरिटेज सोसायटी, बाईफ रोड,वाघोली) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना वाघोलीतील बाईफ रोडवरील आर पी एस हेरिटेज सोसायटीत २४ जानेवारी रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली.
याबाबत नंदा विजय दिवटे (वय ३७, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी कैलास विठ्ठल राठोड (वय १९, रा. नागपाल रोड, चंदननगर), सुशील ऊर्फ अण्णा कदम (रा. चंदनगर), गणेश कट्टे (रा. खराडी) यांच्यासह २ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
