Pune Crime News | अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दारु पाजून तिच्याशी अश्लिल वर्तन करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिचा विनयभंग केला. तिला जबरदस्तीने मित्राच्या  घरी नेऊन तिला दारु पाजून मारहाण करुन तिच्याशी  अश्लिल वर्तन करण्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी येवलेवाडी पोलिसांनी अशिष सुर्वे (वय २०) आणि अर्जुन (वय २०, दोघेही रा. टिळेकरनगर) यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना टिळेकरनगर येथे २४ जानेवारी रोजी सायंकाळी सव्वापाच ते रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष सुर्वे याने अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिला मिठी मारुन तिचा विनयभंग केला. तिला अर्जुन या मित्राच्या घरी जबरदस्तीने घेऊन गेला. तिथे त्यांनी तिला जबरदस्तीने दारु पिण्यास लावली. तिला मारहाण करुन आशिष सुर्वे याने तिच्याशील अश्लिल वर्तन केले. त्यानंतर तिने येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक पठाण तपास करीत आहेत.

You may have missed