Pune Crime News | विवाहाचा आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करुन 26 लाख रुपये घेऊन केली फसवणूक
पुणे : Pune Crime News | विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून २५ लाख ७६ हजार रुपये घेऊन तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ३३ वर्षाच्या तरुणीने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरुन पोलिसांनी अमितकुमार कृष्णमोहन गोस्वामी Amitkumar Krishnamohan Goswami (वय २८, रा. श्रीराम चाळ, अप्पा पाडा, कुरार व्हिलेज, मालाड ईस्ट, मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २३ एप्रिल २०२५ ते ६ जानेवारी २०२६ दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी आणि आरोपीची ओळख झाली होती. आरोपीने तरुणीला जाळ्यात ओढले. तिला विवाहाचे आमिष दाखविले. त्यानंतर गेल्या दहा महिन्यात आरोपीने तरुणीला वेगवेगळी कारणे सांगून तिच्या बँक खात्यातून वेळोवेळी २५ लाख ७६ हजार रुपये घेतले. तरुणीने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पैसे परत मागितल्यावर तरुणीला तसेच तिच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने नुकतीच पोलिसंकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक थोरात तपास करत आहेत.
