Pune Crime News | नवीन वस्तू  बनवुन देण्याच्या नावाखाली सराफांची सव्वा तीन कोटींची फसवणूक; कोरेगाव पार्क पोलिसांनी एकाला केली अटक

Pune Crime News | Goldsmiths cheated of Rs. 3.5 crores in the name of making new items; Koregaon Park police arrested one

पुणे : Pune Crime News | सोने, चांदी घेऊन त्याबदल्यात नवीन वस्तू सराफ कारागिरांकडून तसेच व्यावसायिकांकडून बनवुन घेतल्या जातात. नवीन वस्तू देण्याचा वायदा करुन कोणाकडून ६० किलो चांदी, कोणाकडून सोने, रोकड घेऊन सराफ व्यावसायिकांची सव्वातीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

याबाबत संजय पुष्कराज राठोड (वय ५५, रा. सुजय गार्डन, मुंकुदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अमन कोरीमुथा (वय २७, रा. शांतीनगर सोसायटी, महात्मा फुले पेठ) याला अटक केली आहे. पंकज जैन (कोरीमुथा), नेमीचंद कोरीमुथा, प्रणव कोरीमुथा (रा. शांतीनगर सोसायटी, महात्मा फुले पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २२ जानेवारी २०२६ रोजी बंडगार्डन रोडवरील राठोड ज्वेलर्स येथे घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय राठोड यांचे बंडगार्डन रोडवर राठोड ज्वेलर्स हे दुकान आहे. पंकज जैन, नेमीचंद कोरीमुथा हे नवकार ज्वेलर्स व श्री नवकार प्लस या ज्वेलर्सचे मालक आहेत. राठोड यांनी नवीन माला घेण्यासाठी त्यांना ६० किलो चांदी दिली होती. ते नवीन माल दोन ते तीन   दिवसांत देणार होते. परंतु, त्यांनी दोन -तीन दिवसांचा वायदा केल्यानंतरही नवीन वस्तू बनवून दिल्या नाहीत. त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यावर संपर्क होऊ शकला नाही. तेव्हा त्यांनी इतर व्यावसायिक मित्रांकडे चौकशी केली. तेव्हा हरी विजय बाळकृष्ण देवकर यांच्याकडून त्यांनी ९८ लाख रुपये घेतल्याचे समजले. तसेच उमेश दराडे यांना ५० किलो चांदी देण्याचा वायदा करुन त्यांच्याकडून ४० लाख रुपये घेतल्याचे़ समजले. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर राठोड यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी हा व्यवहार पाहणार्‍या त्यांचा पुतण्या अमर कोरीमुथा याला अटक केली आहे. इतरांचा शोध सुरु आहे. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण तपास करीत आहेत.

You may have missed