Pune Crime News | महाविद्यालयीन तरुणाला मारहाण करुन दहशत पसरविणाऱ्या गुंडांची वाघोली पोलिसांनी काढली वरात (Video)

Pune Crime News | Police nab goons who beat up college student and spread terror (Video)

पुणे : Pune Crime News |  वाघोलीतील बकोरी फाटा येथे महाविद्यालयीन तरुणाला जुन्या भांडणाच्या कारणावरुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन दहशत पसरविणार्‍या गुंडांची वाघोली पोलिसांनी त्याच परिसरात वरात काढली.

https://www.instagram.com/p/DUKk9fkCZAg

अमन ऊर्फ मुन्ना दस्तगीर पटे Aman alias Munna Dastagir Pate (वय २५), ईशप्प ऊर्फ विशाल जगन्नाथ पंदी Ishap aka Vishal Jagannath Pandi  (वय २४), मंगेश भगवान निखाते Mangesh Bhagwan Nikhaate (वय २३), जिवक संजय ओव्हाळ Jivak Sanjay Oval (वय २०), आदित्य बापू शिंदे Aditya Bapu Shinde (वय २५), ओम प्रवीण कुसाळकर Om Praveen Kusalkar (वय २०, सर्व रा. वाघोली) अशी अटक केलेल्या गुंडांची नावे आहेत.

याबाबत संघर्ष सुनील सातव (रा. वाघोली) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचे मित्र बकोरी फाटा येथील एका गेमझोनमध्ये पुलटेबल खेळत होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांच्यात पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून गुंडांनी संघर्ष सातव यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती.

याबाबत वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी सांगितले की, मुन्ना पटेल, विशाल पंदी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या भागातील महाविद्यालयीन परिसरात तरुणांना मारहाण करुन ते आपली दहशत पसरवित होते.

You may have missed