Pune Crime News | माथाडी कामगार पुरविण्यावरुन झालेल्या वादातून तरुणावर वार करुन केले गंभीर जखमी, पाटील इस्टेटमधील घटना
पुणे : Pune Crime News | माथाडी कामगार पुरविण्यावरुन त्यांच्यात पूर्वी झालेल्या वादातून तरुणावर शस्त्राने मानेवर,गालावर वार करुन गंभीर जखमी केले.
आदिल जावेद शेख (वय २२, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अल्ताफ मोहमंद शेख Altaf Mohmand Shaikh (वय २०, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पाटील इस्टेट येथील किराणा मालाचे दुकानासमोर १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माथाडी कामगार पुरविण्यावरुन त्यांच्यात पूर्वी भांडणे झाली होती. आदिल शेख हा रमजान महिन्याचा रोजा सोडण्यासाठी घरी जात होता. तो किराणा दुकानाजवळ आला असताना त्या ठिकाणी अल्ताफ शेख याने त्याच्या शर्टची कॉलर पकडून शिवीगाळ करु लागला. तेव्हा आदिल याने कोणाला शिव्या देतो, असे विचारले. त्यावर त्याने अचानक कंबरेला ठेवलेले धारदार हत्यार काढून गालावर वार केला. पुन्हा मानेवर वार केला. तो पुन्हा वार करणार तितक्यात आदिल याला कोणीतरी मागे ओढले. त्यावर अल्ताफ याने हातातील हत्यार उगारुन “मै यहा का भाई हू, कोई बीच मे आया तो इधर ही काट दुंगा,” असे म्हणत दहशत निर्माण करीत लोकांच्या अंगावर धावून गेला. त्यामुळे लोक पळून गेले. आदिल शेख यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक दिघे तपास करीत आहेत.
