Pune Festival 2026 | 38 व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये गोल्फ कप स्पर्धा उत्साहात संपन्न
Pune Festival 2026 | ३८व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘पुणे फेस्टिव्हल गोल्फ कप टूर्नामेंट’ आज संपन्न झाली. यामध्ये १२२ हून अधिक नामवंत खेळाडू झाले होते. त्यामध्ये अनेक कंपन्यांचे सीईओ व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. सकाळी ६.३० वाजता पुणे गोल्फ स्पर्धेचे श्री. जी.एम पटवर्धन, कार्तीकेयन, सुनील शिरोळे, अपूर्व किशोर यांच्या टीमने उद्घाटन केले. यावेळी पुणे फेस्टिव्हलचे क्रीडा समिती संयोजक प्रसन्ना गोखले उपस्थित होते.
ही स्पर्धा स्टेबलफोर्ड प्रकारातील हँडीकॅप डिव्हिजनमध्ये गोल्ड व सिल्व्हर गटामध्ये झाली. यामध्ये बेस्ट लॉंगेस्ट ड्राइव्ह, स्ट्रेटेस्ट ड्राइव्ह आणि क्लोजेस्ट टू पिन विजेत्यांना विशेष पारितोषिकाने गौरवले गेले. याबरोबरच गोल्ड विभागात अवनय खन्ना या विजेत्याला पुणे फेस्टिव्हल रोलिंग ट्रॉफी दिली गेली.
पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, डॉ. पराग संचेती आणि सुमिर कलमाडी यांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न झाले. या प्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, क्रीडा समितीचे प्रमुख प्रसन्न गोखले उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे –
१. गोल्ड डिव्हिजन हँडीकॅप
विजेते – अवनय खन्ना
१st रनर अप – वाण्या सिंग
२nd रनर अप – नितेश शिंदे
२. सिल्व्हर डिव्हिजन हँडीकॅप
विजेते – सचिन देवधर
१st रनर अप – रजत बुधराज
२nd रनर अप – अजय जोशी
३. ब्रॉंझ डिव्हिजन
विजेते – कुणाल आगाशे
१st रनर अप – निश्चया अबभी
२nd रनर अप – सोफिया ह्यो सून किम
३. क्लोजेस्ट टू द पिन ऑन होल नं ४
१. विजेते – अमित चिलाल
- स्ट्रेटेस्ट ड्राइव्ह ऑन होल नं १४
विजेते – विकास शेवारे
६. लॉंगेस्ट ड्राइव्ह ऑन होल नं १८ (पुरुष)
विजेते – विस्मय धोंसाळे
७. लॉंगेस्ट ड्राइव्ह ऑन होल नं १८ (महिला)
विजेती – दीपा सिंगल
फोटो ओळ : डावीकडून अपूर्व किशोर, भाऊसाहेब पटवर्धन, कार्तीकायन, सुनील शिरोळे.
