Pune Police News | गुन्हा दाखल झालेल्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील अधिकारी, अंमलदारांची तडकाफडकी बदली
पुणे : Pune Police News | अल्पवयीन मुलांना पोलीस व्हॅनच्या बोनेटवर बसवुन धिंड काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल संभाजी थोरात, पोलीस उपनिरीक्षक नीलेश राजेंद्र मोकाशी, अण्णा मधुकर दराडे, सद्दाम हुसेन दस्तगीर फकीर या अधिकार्यांची विशेष शाखा येथे बदली करण्यात आली आहे.
तसेच पोलीस हवालदार सुनिल दादा हनवते, दिनेश विनायक तापके, पोलीस अंमलदार मितेश दत्तात्रय चोरमले, सागर चंद्रकांत बोरगे, सोहम कैलास शेंडकर, मंगेश जयसिंग पवार, राहुल अशोक औंधकर, रवींद्र शंकर गायकवाड, संदिप लक्ष्मण आगळे, तुकाराम पंडित सुतार, सुवर्णा दत्तात्रय भिसे या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील अंमलदारांची मुख्यालयात बदली करण्यात आली. या अंमलदारांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्याकरीता तात्काळ कार्यमुक्त करावे़ या अंमलदार यांना कार्यमुक्त केल्याचा व ते बदली ठिकाणी हजर झाल्याबाबतचा अनुपालन अहवाल कार्यालयास सादर करावा, असे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढले आहेत.
कोणत्याही पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना सर्वप्रथम निलंबित केले जाते. त्यानंतर त्यांची विभागीय चौकशी करण्यात येते. या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निलंबित न करता त्यांची बदली करण्यात आली आहे.
