Kolhapur Accident News | कोल्हापुरात भीषण अपघात! भरधाव कारची दुचाकीला धडक; बँक मॅनेजरचा जागीच मृत्यू

Kolhapur Accident News | Horrific accident in Kolhapur! Speeding car rams into two-wheeler; bank manager dies on the spot.

Kolhapur Accident News | कोल्हापूरमधील पेठवडगाव-हातकणंगले रस्त्यावर मिणचे गावाजवळ कार आणि दुचाकीची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात सांगलीतील HDFC बँकेचे शाखा व्यवस्थापक दीपक रावसाहेब शिंदे (४५, रा. मिरज) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी आशाराणी शिंदे (४०) गंभीर जखमी झाल्या.

दीपक शिंदे हे पत्नीसमवेत कोल्हापूर येथे नातेवाईकांना भेटून दुचाकीवरून मिरजकडे परतत होते. यावेळी समोरून आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणी पेठवडगाव पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

You may have missed