Pune Crime News | लोणीकंद : पुणे हादरले! दोन वर्षांपूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून 21 वर्षीय तरुणाचा कोयत्याने सपासप वार करून खून

Pune Crime News | Lonikand: Pune shook! Holding a grudge from a fight two years ago, a 21-year-old young man killed someone by repeatedly stabbing with a knife

पुणे : Pune Crime News | दोन वर्षांपूर्वी तरुणाने एका अल्पवयीन मुलाला मारहाण केली होती. त्याचा राग मनात ठेवून आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने तरुणावर कोयत्याने सपासप वार करुन त्याचा निर्घुण खुन केल्याचा प्रकार समोर आला आहे.

विकासकुमार अनुपकुमार श्रीवास्तव (वय २१, रा. कोरेगाव भीमा) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. लोणीकंद पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे. याबाबत आकाशकुमार अनुपकुमार श्रीवास्तव (वय २३, रा. कोरेगाव भीमा) यांनी लोणीकंद पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.  ही घटना वढु खुर्द येथील सार्वजनिक रोडवर १४ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकासकुमार श्रीवास्तव हा वडिलांबरोबर एमआयडीसीमधील कंपनीत कामाला होता. आरोपी मुलांनी दहावीनंतर शिक्षण सोडले आहे. त्याने एका अल्पवयीन मुलाला २ वर्षांपूर्वी मारहाण केली होती. त्यावेळी त्याने पोलिसांकडे तक्रार केली नव्हती. ४ -५ दिवसांपूर्वी त्यांच्यात काही कारणावरुन भांडणे झाली होती. हा राग मनात धरुन या अल्पवयीन मुलाने इतर दोघा लहान मुलांना मदतीला घेऊन विकासकुमार श्रीवास्तव याला मारण्याचा कट रचला. विकासकुमार हा वढु खुर्द येथील आमदारनगर येथे सायंकाळी थांबला असताना या अल्पवयीन मुलांनी त्याला घेरले. त्याच्या चेहर्‍यावर, मानेवर, गळ्यावर व छातीवर कोयत्याने सपासप वार केले. त्यामुळे विकासकुमार याचा जागीच मृत्यु झाला. ही घटना समजल्यानंतर लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खुनाचा गुन्हा दाखल करुन मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक स्वाती खेडकर तपास करीत आहेत.

You may have missed