4 Independent MLAs Supporting Shivsena Shinde Group | 4 अपक्ष आमदारांचा शिंदे गटाला पाठिंबा मिळणार, नेत्यांमध्ये चर्चा सुरु

eknath shinde

मुंबई : 4 Independent MLAs Supporting Shivsena Shinde Group | विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election Results 2024) महायुतीला (Mahayuti) अभूतपूर्व यश मिळालं आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये इतकं घवघवीत यश कुणालाही मिळालं नाही. महायुतीने या निवडणुकीत पहिल्यांदाच २३५ पेक्षा जास्त जागांवर यश मिळवले. यामध्ये भाजपचा १४८ जागांपैकी १३२ जागांवर, शिंदे गटाचा ८५ जागांपैकी ५७ जागांवर तर अजित पवार गटाचा ५१ जागांपैकी ४१ जागांवर विजय झाला आहे.

दरम्यान आता शिवसेना शिंदे गटाला आता अजून चार अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. सध्या शिवसेनेचे ५७ विजयी आमदार आहेत. त्यात आता अपक्ष समर्थक ४ आमदारांचा पाठिंबा शिंदेसेनेला मिळाला आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता महायुती सत्ता स्थापन करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. यात शिंदे गटाचे ५७ अधिकृत आमदार चिन्हावरून निवडून आलेले आहेत. त्यानंतर आता शिंदे गटाला ४ अपक्ष आमदारांचा देखील पाठिंबा मिळणार आहे.

त्यादृष्टीने आता चर्चा सुरू झाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांचा आकडा ६१ वर पोहोचणार आहे.
यानंतर आता राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून शिवसेना शिंदे गट ओळखला जाणार आहे. (4 Independent MLAs Supporting Shivsena Shinde Group)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pravin Darekar On Devendra Fadnavis | “देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील”, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य

Maharashtra Assembly Election Results | विधानसभा निवडणूक २०२४; देवेंद्र फडणवीस,
आदिती तटकरे, धनंजय मुंडे, गिरीश महाजन विजयी

Sanjay Raut On Assembly Results | ‘निकालामागे खूप मोठं कारस्थान, लोकशाहीचा कौल वाटत नाही”, संजय राऊत संतापले, म्हणाले – ‘मविआला ७५, १०० जागाही देत नसाल तर…’

Maharashtra Assembly Election Results | महाराष्ट्रात भाजप महायुतीची लाट, मविआची मोठी
पिछेहाट, लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट

You may have missed