Aadhaar PVC Card ची ही मजबूत सुरक्षा वैशिष्ट्ये फसवणुकीपासून वाचवतात, कॉपी करणे नाही सोपे

aadhaar pvc card

नवी दिल्ली : Aadhaar PVC Card | कागदी आधारकार्डपेक्षा वेगळे असे पीव्हीसी आधार कार्ड एक चांगला पर्याय होऊ शकतो. हे आधार कार्ड पाणी लागल्याने अथवा खिशात दुमडण्याची शक्यता नसते. पीवीसी आधार कार्ड एखाद्या क्रेडिट कार्ड सारखे दिसते. ते वॉलेटमध्ये ठेवता येते. हे आधार वापरण्याचे एक मोठे कारण म्हणजे त्याच्यामधील मजबूत सुरक्षा फिचर्स (Aadhaar PVC Card security features) असू शकते.

आधार पीव्हीसी कार्ड (Aadhaar PVC Card) मध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये असतात. या सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे हे पीव्हीसी कार्ड टेम्पर-प्रूफ आयडेंटिफिकेशन कार्ड बनते.

आधार पीव्हीसी कार्डमध्ये कोणती सुरक्षा वैशिष्ट्ये असतात…

सिक्युर क्यूआर कोड –
या आधार कार्डमध्ये डिजिटल साईन क्यू आर कोड असतो. या कोडमध्ये आधार कार्ड होल्डरचा फोटो आणि डेमोग्राफिक माहिती असते. हा क्यूआर स्कॅन करून ओळख सत्यापित करण्यासारखी अनेक कामे ऑनलाइन होतात. हा क्यूआर कोड स्कॅन करून इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यापासून बँक अकाऊंट ओपन करता येऊ शकते.

होलोग्राम –
आधार पीव्हीसी कार्डमध्ये होलोग्राम असतो. या होलोग्राममुळे फसवणुक करणारे त्याची कॉपी करू शकत नाहीत.

मायक्रो टेक्स्ट –
आधार पीव्हीसी कार्डमध्ये मायक्रो टेक्स्ट असते. जे वाचण्यासाठी मॅग्नीफाइंग ग्लास आवश्यक असते. यामुळे कार्ड कॉपी करणे सोपे नाही.

घोस्ट इमेज –
या आधार पीवीसी कार्डमध्ये व्यक्तीच्या फोटोची घोस्ट इमेज असते. ही इमेज कार्डवर प्रकाश टाकल्यावरच दिसते. या वैशिष्ट्यामुळे कार्ड खरे की बनावट हे समजते.

इश्यू आणि प्रिंट डेट –
Aadhaar PVC Card आधार पीव्हीसी कार्डमध्ये ते इश्यू केल्याची तारीख नोंदवलेली असते. यासोबतच कार्ड प्रिंट केल्याची तारीख असते. या दोन्ही तारखांद्वारे कार्डची सत्यता पडताळता येते.

आधार लोगो –
आधार पीव्हीसी कार्डवर आधारचा वर आलेला आधार लोगो असतो, यामुळे ते कॉपी करता येत नाही.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Hit & Run Case | पुणे हिट अँड रन: ऑनड्युटी असलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना उडवलं,
एकाचा मृत्यू तर एक गंभीर

Rain In Lonavala Khandala | लोणावळा, खंडाळ्यात संततधार; पाऊस, धुके अन् पर्यटकांची गर्दी

Sharad Pawar On Devendra Fadnavis | “फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला पण आता…”
शरद पवारांचे मोठे विधान

You may have missed