Aarpaar Marathi | ‘आरपार’तर्फे प्रसारित केलेल्या पुनीत बालन प्रस्तुत ‘बाप्पा मोरया रे’ विसर्जन मिरवणुकीच्या ‘थेट प्रक्षेपणाला’ भरघोस प्रतिसाद!
पुणे : Aarpaar Marathi | १७ सप्टेंबरला ‘आरपार’ या युट्यूब चॅनेलवर पुनीत बालन (Punit Balan) प्रस्तुत ‘बाप्पा मोरया रे’ या कार्यक्रमात पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचं २४ तास थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं. ५ लाखांहून अधिक प्रेक्षकांनी हा कार्यक्रम पाहिला.
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक म्हणजे एक मंगलमय सोहळाच! लाखो भाविक श्रद्धेने पुण्यातील गणपतींचे दर्शन घेण्यासाठी येतात, खासकरून ‘विसर्जन मिरवणूक’ बघण्यासाठी! ‘आरपार’ (Aarpaar) तर्फे एकही जाहिरात न दाखवता २४ तास सलग पुण्यातील पाच मानाच्या व इतर विविध गणपतींचे विसर्जन दाखवण्यात आले. असा उपक्रम राबवणारे मराठीतील हे एकमेव चॅनेल ठरले आहे.
गणपती विसर्जनाचे Live Updates, विविध ढोल ताशा पथकांचे वादन या सगळ्याबरोबरच अनेक मान्यवरांच्या मुलाखती या कार्यक्रमात घेण्यात आल्या. आदरणीय साखरे महाराज, मिलिंद शिंत्रे, समीर आठल्ये, सौरभ गोखले- श्रुती मराठे, देवेंद्र गायकवाड, पांडुरंग सांडभोर, सुनीत भावे या मान्यवरांशी गप्पा मारण्यात आल्या. मिलिंद कुलकर्णी, प्रसाद भारदे, विनोद सातव यांच्या समालोचनामुळे या कार्यक्रमाला चार चांद लागले.
केवळ भारतातच नाही, तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, रशिया,
युरोप अशा विविध देशांमधून प्रेक्षकांनी हा कार्यक्रम पाहिला. “दरवर्षी आम्ही न चुकता गणपती विसर्जन मिरवणुकीला जातो, यावर्षी तब्येतीच्या कारणामुळे मिरवणुकीला येणं जमलं नाही, पण ‘आरपार’मुळे घरबसल्या हा सोहळा बघता आला आणि आपणही विसर्जन मिरवणुकीत सहभागी आहोत, हा आनंद घेता आला, त्यामुळे ‘आरपार’ टीमचे मनःपूर्वक आभार!” अशा प्रतिक्रिया अनेक प्रेक्षकांनी नोंदवल्या.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/