ACB File FIR On Police Havaldar | 7 लाखाची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदारावर एसीबीकडून गुन्हा
ठाणे : ACB File FIR On Police Havaldar | एका गुन्ह्याच्या प्रकरणात तक्रारदाराकडून सात लाख रुपये लाच मागणाऱ्या आणि तडजोडी अंती पाच लाख रुपये लाच स्वीकारण्यास तयार झालेला कल्याण मधील महात्मा फुले पोलीस ठाण्यातील (Mahatma Phule Police Station) पोलीस हवालदार सुचित निवृत्ती टिकेकर Suchit Nivrutti Tikekar (वय-40) यांच्यावर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Thane ACB Bribe Case)
तक्रारदाराच्या मित्राच्या मेहुण्याविरुद्ध महात्मा फुले पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या प्रकरणात मेहुण्याला आरोपी करण्यात येऊ नये म्हणून तक्रारदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस हवालदार सुचित टिकेकर यांच्याकडे मागणी केली होती. मेहुण्याला दाखल तक्रारीत आरोपी करायचे नसेल तर ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी सात लाख रुपये लागतील, अशी मागणी हवालदार टिकेकर यांनी तक्रारदारकडे केली.
गेल्या महिन्यात हा प्रकार सुरु झाला होता. लाचेची रक्कम कमी करण्याची मागणी तक्रारदार यांनी केली. मात्र हवालदार टिकेकर याला तयार नव्हता. अखेर टिकेकर हे तडजोडी अंती पाच लाख रुपये स्वीकारण्यास तयार झाले. टिकेकर लाच मागत असल्याची माहिती तक्रारदार यांनी ठाणे एसीबी विभागाचे अधीक्षक सुनील लोखंडे यांना कळवली. लोखंडे यांच्या आदेशावरुन ठाणे एसीबी पथकाने पडताळणी केली. टिकेकर यांचे तक्रारदाराशी होणाऱ्या संभाषणावर नजर ठेवली.
पोलीस हवालदार टिकेकर तक्रारदाराकडे लाच मागत असल्याची खात्री पटल्यानंतर एसीबीच्या पथकाने तांत्रिक पुरावे जमा केले.
त्या आधारे एसीबीचे पोलीस निरीक्षक विजय कावळे
यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात हवालदार सुचित टिकेकर याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ठाणे विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे,
अपर पोलीस अधीक्षक गजानन राठोड, महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय कावळे व
त्यांच्या पथकाने केली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड