ACB Trap On Female Sarpanch | विकास निधी देण्यासाठी लाचेची मागणी, महिला सरपंच व पती अँटी करप्शनच्या जाळ्यात

ACB

छत्रपती संभाजीनगर : ACB Trap On Female Sarpanch | गावातील विकास कामासाठी निधी देण्यासाठी उपसरपंच यांच्याकडून 50 हजार रुपये लाच घेताना टाकळीमाळी ग्रुप ग्रामपंचायतच्या महिला सरपंच व त्यांच्या पतीला छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.16) करण्यात आली. ज्योती आनंद गवळी Jyoti Anand Gawli (वय 26), पती आनंद रमेश गवळी Anand Ramesh Gawli (वय -32) असे लाच घेताना पकडलेल्या दोघांची नावे आहेत. (Chhatrapati Sambhaji Nagar ACB Trap)

याबाबत 43 वर्षीय व्यक्तीने छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. तक्रारदार हे टाकळीमाळी ग्रुप ग्रामपंचायत येथे उपसरपंच पदावर कार्यरत आहेत. सरपंच ज्योती गवळी यांचे पती आनंद गवळी यांनी तक्रार यांना 15 वित्तआयोगातील मंजूर निधीतून हुसेनपूर गावातील विकास कामाकरिता 3 लाख रुपये विकास निधी देण्याकरिता 50 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी एसीबीकडे याबाबत तक्रार केली. (Chhatrapati Sambhaji Nagar Bribe Case)

एसीबीच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता आरोपी आनंद गवळी याने सरपंचपती या नात्याने तक्रार यांना विकास निधी देण्यासाठी 50 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. ती रक्कम सरपंच ज्योती गवळी यांच्या संमतीने पंचासमक्ष स्वीकारताना आनंद गवळी यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर करमाड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव,
पोलीस उप अधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयमाला चव्हाण,
पोलीस हवालदार राजेंद्र सिनकर, पोलीस अमलदार विलास चव्हाण, चांगदेव बागुल यांच्या पथकाने केली.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Mumbai-Pune Expressway Accident | पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; 5 ठार, 42 जखमी

ACB Trap On Policeman (ASI) | लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | पुणे: खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक

Police Sub Inspector (PSI) Dismissed In Pune | पुणे : 3 लाखांची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक पोलीस सेवेतून बडतर्फ

You may have missed