ACB Trap On Police Constable | गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाचेची मागणी, पोलिसासह पंटर अँटी करप्शनच्या जाळ्यात
सोलापूर : ACB Trap On Police Constable | सांगोला पोलीस ठाण्यात (Sangola Police Station) दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी 40 हजार रुपये लाचेची मागणी करुन 25 हजार रुपये लाच स्वीकारताना पोलीस शिपाई व खासगी व्यक्तीला सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले (Solapur ACB Trap). ही कारवाई सोमवारी (दि.22) करण्यात आली. (Solapur Bribe Case)
पोलीस शिपाई सोमनाथ बबन माने (Somnath Baban Mane), खासगी इसम अक्षय दत्तात्रय पवार Akshay Dattatraya Pawar (रा. वाटंबरे ता. सांगोला) अशी लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदार यांच्या मुलाच्या नावावर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्यात कलम वाढ न करण्यासाठी, अटक न करता जामीनावर सोडण्यासाठी तसेच गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलीस शिपाई सोमनाथ माने याने खासगी इसम अक्षय पवार याच्या मार्फत 40 हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याबाबत सोलापूर एसीबीकडे तक्रार केली.
एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता पोलीस शिपाई माने याने 40 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. त्यानंतर 30 हजार रुपयांची लाच मागून तडजोडी अंती 25 हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य करुन लाचेची रक्कम अक्षय पवार याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार एसीबीने सापळा लावून अक्षय पवार याला तक्ररादार यांच्याकडून लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. दोघांवर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (ACB Trap On Police Constable)
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलीस अंमलदार कोळी,
सोनवणे, किणगी, गायकवाड यांच्या पथकाने केली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून आयटी तरुणाची आत्महत्या