ACB Trap On Police Sub Inspector (PSI) | बक्षीस म्हणून लाचेची मागणी, पैसे घेताना पोलीस उपनिरीक्षक व कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

ACB-Police

धाराशिव : ACB Trap On Police Sub Inspector (PSI) | हॉटेल व्यावसायिकावर शेळ्या चोरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या गुन्ह्यात मदत केल्याप्रकरणी बक्षीस म्हणून पाच हजार रुपये लाच स्वीकारताना कळंब पोलीस ठाण्यातील (Kalamb Police Station) परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस हवालदार यांना धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि.19) केली. (Dharashiv ACB Trap)

परिविक्षाधीन पोलीस उप-निरीक्षक रामचंद्र किसन बहुरे (Ramchandra Kisan Bahure), पोलीस हवालदार महादेव तात्याभाऊ मुंडे Mahadev Tatyasaheb Munde (वय-37) असे लाचखोर पोलिसांची नावे आहेत. याबाबत 35 वर्षीय व्यक्तीने धाराशीव एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांचे कळंब तालुक्यातील सोलापुर-धुळे महामार्गावरील (Solapur Dhule Highway) उपळाई पाटी येथे दिनेश व्हेज/नॅानव्हेज या नावाचे रेस्टॉरंट आहे. या धाब्या समोर काही दिवसापुर्वी ०३ शेळया व ०२ बकरे बेवारस मिळुन आले होते. या शेळया व बकरे तक्रारदार यांचे ताब्यात मिळालेबाबत तक्रारदार यांचेवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Dharashiv Bribe Case)

तक्रारदार यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११०/११७ अन्वये किरकोळ कारवाई केली करण्यात आली होती. तक्रारदार यांना मदत केली म्हणुन परिविक्षाधीन पोलीस उप निरीक्षक रामचंद्र बहुरे व पोलीस हवालदार महादेव मुंडे यांनी तक्रारदार यांचेकडे बक्षीस म्हणून पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबी कार्यालयात येऊन तक्रार केली. एसीबीच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता आरोपींनी बक्षीस म्हणुन पाच हजार रुपये लाच रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. पथकाने सापला लावून मुंडे यांना लाचेची रक्कम स्विकारताना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस उप निरीक्षक बहुरे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे,
अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे,
पोलीस अमलदार इफ्तेकार शेख, मधुकर जाधव, नागेश शेरकर यांच्या पथकाने केली. (ACB Trap On Police Sub Inspector (PSI))

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pipani Symbol Freeze | निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; शरद पवार गटाला दिलासा; विरोधकांची ‘पिपाणी’ वाजणे ‘बंद’

Manorama Khedkar | मनोरमा खेडकरची पिंपरी-चिंचवड येथील कंपनी होणार जप्त; खेडकरांचा पाय आणखी खोलात

PMC Solid Waste Management | घनकचरा विभागाच्या मनमानीला वरिष्ठांचा लगाम; मर्जीतील ठेकेदार पात्र ठरणार नसल्याने घनकचरा विभागात ‘अस्वस्थता’

Pune Crime News | पुणे: घरात घुसून महिलेसमोर अश्लील हावभाव, तरुणाला अटक

You may have missed