ACB Trap On Policeman (ASI) | लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ACB

यवतमाळ : ACB Trap On Policeman (ASI) – गुन्ह्यात मदत करण्यासाठी पाच हजार रुपये लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षकाला यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले (Yavatmal ACB Trap). ही कारवाई सोमवारी (दि.15) पांढरकवडा येथील अण्णाभाऊ साठे चौकात सापळा रचून केली. प्रकाश बापुराव भगत Prakash Bapurao Bhagat (वय-57 रा. जगदंब लेआऊट, संकटमोचन रोड, पांढरकवडा जि. यवतमाळ) असे लाचखोर पोलिसाचे नाव आहे. (Yavatmal Bribe Case)

याबाबत तक्ररारदार यांनी यवतमाळ एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्यावर पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भगत करत आहेत. गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व पीसीआर न घेण्यासाठी तसेच गुन्ह्यात मदत करण्यासाठी भगत यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाचेची मगणी केली. (ACB Trap On Policeman (ASI))

तक्रारदार यांनी यवतमाळ एसीबी कार्यालयात सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भगत पाच हजार रुपये लाच मागत असल्याची तक्रार केली. प्राप्त तक्रारीनुसार एसीबीच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली. त्यावेळी प्रकाश भगत यांनी तक्रारदार यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पाच हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार पांढरकवडा येथील अण्णाभाऊ साठे चौकात सापळा रचण्यात आला.
तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना प्रकाश भगत यांना रंगेहात पकडण्यात आले.
त्यांच्यावर पांढरकवडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chinchwad Assembly Constituency | चिंचवड विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार; शत्रुघ्न काटेंचे शक्तिप्रदर्शन

Pune Monsoon Rain | पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Yerawada Jail News | येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी फरार

You may have missed