ACB Trap On Two Mahavitaran Officers | महावितरणच्या दोन लाचखोर अधिकाऱ्यांना एसीबीचा करंट, एक लाख लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
छत्रपती संभाजीनगर : ACB Trap On Two Mahavitaran Officers | केलेल्या कामाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी साडे तीन लाखांची लाच मागितली. त्यापैकी दीड लाख रुपये घेतले. उर्वरीत दोन लाख रुपयांपैकी एक लाख रुपये लाच स्वीकारताना महावितरण कंपनीचा कार्यकारी अभियंता व उप व्यवस्थापक यांना छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कन्नड विभागच्या कार्यालयात बुधवारी (दि.10) करण्यात आली. (Chatrapati Sambhajinagar ACB Trap)
कार्यकारी अभियंता (क्लास वन) धनाजी रघुनाथ रामुगडे Dhanaji Raghunath Ramugade (वय-54 रा. चंद्रलोक नगरी, कन्नड विभाग, जि छत्रपती संभाजीनगर), उप व्यवस्थापक प्रवीण कचरू दिवेकर Praveen Kachru Divekar (रा. प्लॉट नं 40, चिनार गार्डनमागे, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) असे लाच घेताना पकडलेल्या दोन अधिकाऱ्यांची नावे आहेत. याबाबत 42 वर्षीय ठेकेदाराने छत्रपती संभाजीनगर एसीबीकडे तक्रार केली आहे. (Chatrapati Sambhajinagar Bribe Case)
तक्रारदार यांनी केलेले कामाचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आरोपी रामुगडे व दिवेकर यांनी तक्रारदार यांचेकडे 3 लाख 50 हजार रुपयांची मागणी केली. त्यापैकी दिड लाख रुपये यापूर्वी घेतले. उर्वरित दोन लाख रुपयांची मागणी आरोपींनी केली. याबात तक्रारदार यांनी मंगळवारी एसीबी कार्यालयात तक्रार केली. (ACB Trap On Two Mahavitaran Officers)
एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता आरोपींनी साडे तीन लाख रुपयांची मागणी करुन दीड लाख रुपये यापूर्वी स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर उर्वरीत दोन लाख रुपयामध्ये तडजोड करून 1 लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार पथकाने आज रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कन्नड विभाग चे कार्यालयात सापळा लावला. तक्रारदार यांच्याकडून एक लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना आरोपी धनाजी रामुगडे व आरोपी प्रवीण दिवेकर यांना कार्यकारी अभियंता कक्षात लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव,
पोलीस उप अधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल धस,
पोलीस अंमलदार युवराज हिवाळे, रवींद्र काळे, आत्माराम पैठणकर, चालक बागुल यांच्या पथकाने केली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Reliance Retail | अनंतच्या विवाहापूर्वी नवीन बिझनेस सुरू करण्याची तयारी,
‘या’ व्यवसायात एंट्री करणार मुकेश अंबानी, चीनची कंपनी आणणार भारतात
Pune Crime News | पुणे: गाडीत बसण्यास नकार दिल्याने अश्लील शिवीगाळ करुन असभ्य वर्तन, एकाला अटक
Gautam Gambhir | गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाहांची घोषणा
Pune Bopodi Hit & Run Case | पुणे पोलीस हवालदार मृत्यू प्रकरण : कारमधील तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात,
कारला ओव्हरटेक केल्याचा आला राग, भरधाव वेगात कार चालवली अन्…