Accident News | दुर्दैवी ! अयोध्येहून दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला; महाराष्ट्रातील 2 महिला डॉक्टरांचा मृत्यू

Doctor Accident

मुंबई : – Accident News | अयोध्येत मंदिराचे दर्शन घेऊन परतत असताना महाराष्ट्रातील दोन महिला डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे, तर चार जण जखमी झाले आहेत. गुणा-शिवपुरी चौपदरी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात या दोन महिला डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सविस्तर माहिती अशी की, दहा दिवसापूर्वी महाराष्ट्रातील डॉक्टरांची टीम अयोध्येत दर्शनाला गेली होती. दर्शन घेऊन परत येत असताना एर्टिगा कार अनियंत्रित झाली आणि हा अपघात झाला. अपघातानंतर दीड तास घटनास्थळी पोलिसांची कोणतीही मदत पोहचली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे एका महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या महिला डॉक्टरचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या अपघातात इतर चार डॉक्टर जखमी झाले आहेत.

गुणा-शिवपुरी चौपदरी महामार्गावर लुकवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरात दर्शन घेऊन सगळे डॉक्टर उज्जैनमध्ये महाकाल मंदिरात दर्शनासाठी येत होते. महाकाल मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ते पुन्हा मुंबईला जाणार होते, परंतु, महाकाल मंदिरात जायच्या आधीच महामार्गावर त्यांच्या कारचा अपघात झाला.

You may have missed