ACP Satish Govekar | राष्ट्रपती पदकप्राप्त एसीपी सतीश गोवेकर यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभाचे रविवारी आयोजन
पुणे : ACP Satish Govekar | राष्ट्रपती पदकाने सन्मानित सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) सतीश गोवेकर येत्या शुक्रवारी सेवानिवृत्त होत आहेत. या निमित्ताने पुणेकरांच्या वतीने गोवेकर यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी (ता. १ सप्टेंबर) सायंकाळी ५.३० वाजता घरकुल लॉन्स, डीपी रस्ता, पुणे येथे हा समारंभ होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.
पुणे शहरात गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त म्हणून काम करताना गोवेकर यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा लावून शहर पोलिस दलात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या या साहसी कारकिर्दीचा सन्मान म्हणून ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) असणार आहेत.
या समारंभाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne), राज्याचे माहिती आयुक्त मकरंद रानडे (Makrand Ranade) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) शहराध्यक्ष दीपक मानकर, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संजय मोरे व गजानन थरकुडे, शिवसेनेचे शहर प्रमुख अजय भोसले व प्रमोद भानगिरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सतीश गोवेकर सेवापूर्ती गौरव समितीमध्ये बाळासाहेब दाभेकर, अंकुश काकडे, दत्ता सागरे,
प्रमोद घाडगे, अजित दरेकर, बाळासाहेब बोडके, ऍड. मंदार जोशी, संदीप खर्डेकर, बापूसाहेब भेगडे,
निरंजन दाभेकर, राजेश येनपुरे, संजय उभे, धनंजय वाडकर, तुषार पाटील, अशोक येनपुरे,
मिलिंद कुलकर्णी यांचा समावेश आहे. (ACP Satish Govekar)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा