ACP Sunil Tambe | गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे (ACP Crime-1) यांची विशेष शाखेत बदली

ACP Sunil Tambe

पुणे : ACP Sunil Tambe | अनेक बहुचर्चित गुन्ह्यांमध्ये तपास अधिकारी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणारे गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 सुनील तांबे यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. सुनील तांबे यांच्या बदलीचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी काढले आहेत.

सुनील तांबे यांची पोलीस आयुक्तालयांतर्गत बदलीचे आदेश पोलीस आयुक्तांनी मंगळवारी (दि.9) दिले आहेत. सुनील तांबे यांच्या जागेवर वानवडी विभागाचे (ACP Wanwadi Division) सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे (ACP Ganesh Ingle) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर हडपसर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh) यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत वानवडी विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

सुनील तांबे यांनी 3 जुलै 2023 रोजी गुन्हे शाखा-1 च्या सहायक पोलीस आयुक्त पदी बदली करण्यात आली होती. पुढील काही महिन्यात तांबे हे सेवानिवृत्त होणार आहेत. त्यापूर्वीच त्यांची बदली गुन्हे शाखेतून विशेष शाखेत करण्यात आली आहे. तांबे हे ललित पाटील (Lalit Patil Drug Case), शरद मोहोळ हत्या प्रकरण (Sharad Mohol Murder Case), पोर्शे कार अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident Case) तपास अधिकारी होते.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Reliance Retail | अनंतच्या विवाहापूर्वी नवीन बिझनेस सुरू करण्याची तयारी,
‘या’ व्यवसायात एंट्री करणार मुकेश अंबानी, चीनची कंपनी आणणार भारतात

Pune Crime News | पुणे: गाडीत बसण्यास नकार दिल्याने अश्लील शिवीगाळ करुन असभ्य वर्तन, एकाला अटक

Gautam Gambhir | गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाहांची घोषणा

Pune Bopodi Hit & Run Case | पुणे पोलीस हवालदार मृत्यू प्रकरण : कारमधील तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात,
कारला ओव्हरटेक केल्याचा आला राग, भरधाव वेगात कार चालवली अन्…

You may have missed