Action On Nylon Manja Dealers In Pune | पुणे: बंदी असतानाही शहरात मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजाची विक्री सुरुच; पोलिसांनी एकाच दिवशी 9 ठिकाणी कारवाई करुन हजारोंचा मांजा केला जप्त
पुणे : Action On Nylon Manja Dealers In Pune | नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार जखमी होऊन त्यांच्या जीवावर बतले जाण्याच्या अनेक घटना पुणे व इतरत्र घडल्या आहेत. पक्षांनाही या मांजाचा त्रास होतो. गेल्या पाच वर्षात ४०८२ पक्षी मांजामध्ये अडकल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळेच उच्च न्यायालयाने नायलॉन मांजावर बंदी घातली आहे. असे असतानाही पुणे शहरात नायलॉन मांजाची सर्रास विक्री सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी शनिवारी एकाच दिवसात ९ ठिकाणी कारवाई करुन हजारो रुपयांचा मांजा जप्त केला आहे.
वारजे माळवाडी येथील रामनगर कॅनॉल रोडवरील गायत्री जनरल स्टोअर्स येथे सौरभ संतोष पाष्टे (वय १८, रा. खडकमाळ आळी) आणि यश निलेश पेटकर (वय २०, रा. राष्ट्रभूषण चौक, घोरपडी पेठ) यांना नायलॉन मांजा विक्री करताना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ४५ रिळ मांजा जप्त करण्यात आला आहे.
सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार अमोल पाटील यांच्या माहितीवरुन पोलिसांनी योगेश शत्रुघ्न शहा (वय २०, रा. नेवसे हॉस्पिटलजवळ, वडगाव बुद्रुक) याला मांजा विक्री करताना पकडले. त्याच्याकडून ६ हजार ५०० रुपयांचे ११ नायलॉन मांज्याचे रिह जप्त करण्यात आले आहेत.
गुन्हे शाखेच्या युनिट ४ च पथकातील पोलीस अंमलदार विशाल गाडे व हरीष मोरे यांना बातमी मिळाली. त्यावरुन येरवड्यातील मच्छी मार्केटमधील शेलार चाळ येथील दिपा शिंदे (वय ३७) हिच्याकडून ३ हजार २०० रुपयांचा नायलॉन मांजाची चार चकरी जप्त केली आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट १ कडील पोलीस अंमलदार निलेश साबळे यांना मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी तळजाई पठार
येथून एका अल्पवयीन मुलाकडून ४ हजार ५०० रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे.
दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाला मित्र मंडळ चौकाकडून पर्वतीकडे जाणार्या कॅनॉल रोडचे अंतर्गत रोडवर दोघे जण नायलॉन मांजाची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी शशांक चंद्रप्पा धनगर (वय १९, रा. गणेश मळा, सिंहगड रोड) आणि रोहित राम शिंदे (वय ३४, रा. पर्वती दर्शन)
यांच्याकडून ४ हजार ८०० रुपयांच्या चायनीज नायलॉन मांजाच्या ६ चकरी जप्त केल्या आहेत.
औंध मस्जिद जवळील बसस्टॉप शेजारी नायलॉन मांजाची विक्री करणार्या रुपेश नितीन साळुंखे
याच्याकडून चतु:श्रृंगी पोलिसांनी १३ हजार २०० रुपयांचा ११ रिळे मांजा जप्त केला आहे.
पाषाण येथील पाषाण – सुस रोडवरील साई चौकात नायलॉन मांजा विकला जात होता.
बाणेर पोलिसांनी विवेक सुरेश सोळंकी (वय १९, रा. कृष्णविहार सोसायटी, केशवनगर, मुंढवा)
याच्याकडून ४ हजार ५०० रुपयांचा ३ रिळे नायलॉन मांजा जप्त केला आहे.
कात्रज येथील भगवा चौकात एक अल्पवयीन मुलगा नायलॉन मांज्याची विक्री करताना आढळून आला. (Action On Nylon Manja Dealers In Pune)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
ACB Trap On Sanjay Gunjal | अडीच लाखांची लाच घेताना फलोत्पादन उपसंचालकाला केली अटक;
एफआरआय न करण्यासाठी मागितली होती तीन लाखांची लाच
ACP Transfers Pune Police | पुण्यातील सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या;
फरासखाना, हडपसर, खडकी विभाग आणि वाहतूक शाखेत नेमणूका