Action On Thekka Restro & Lounge Hinjawadi | बेकायदा हुक्का विक्री प्रकरणी हिंजवडीतील ‘ठेका हॉटेल’वर कारवाई

hookabar

पिंपरी : Action On Thekka Restro & Lounge Hinjawadi | पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर (Pune Porsche Car Accident Case) अवैध बार, पबवर कारवाई करण्यात येत आहे (Pubs In Pune). रात्री उशीरा चालणाऱ्या हॉटेलवर आणि त्याठिकाणी सुरु असलेल्या अवैध धंद्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. हिंजवडी येतील ‘ठेका हॉटेल’ मध्ये बेकायदेशीरपणे हुक्का विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई रविवारी (दि.7) रात्री अकराच्या सुमारास हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police Station) केली.

हॉटेल मॅनेजर अरविंदसिंग चमेलसिंग (वय-27 रा. आदर्शनगर, हनुमान मंदिर, फेज-1 हिंजवडी, ता. मुळशी), हॉटेल मालक वैभव प्रल्हाद वारडे Vaibhav Prahlad Warde (वय-35 रा. नंदनवन सोसायटी, गुरुद्वारा जवळ, आकुर्डी) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 223, 287 3(5), सिगारेट व अन्य तंबुखु जन्य उत्पादने अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Action On Thekka Restro & Lounge Hinjawadi)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी येथील कस्तुरी चौकात (Kasturi Chowk Hinjewadi) असलेल्या ठेका हॉटेलमध्ये अवैध रित्या हुक्का विक्री केली जात असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली.
त्यानुसार पथकाने हॉटेलमध्ये छापा टाकला.
त्यावेळी आरोपींनी हॉटेलमध्ये हुक्क्याचा वेगळा झोन न करता ग्रहाकांना जेवणासाठी व हुक्का पुण्यासाठी एकत्र बसवले.
ग्राहकांना हुक्का पिण्यासाठी दिल्याचे आढळून आले.
आरोपींनी विनापरवाना, अनाधिकाराने, बेकायदेशीररित्या हुक्का विक्री केली.
या कारवाईत 24 हजार 198 रुपये किमतीचा हुक्का पॉट व हुक्का फ्लेवर जप्त केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Atal Pension Yojana | ज्येष्ठांना 5000 नव्हे 10000 रुपये पेन्शन देणार सरकार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पात करतील घोषणा?

Tomato Price Hike | वेगाने वाढला टोमॅटोचा दर, 100 रुपये किलोवर पोहोचला, जाणून घ्या कधी होणार स्वस्त?

Ajit Pawar NCP Sabha In Baramati | लोकसभा निवडणुकीत लोकसभा पराभव झालेल्या बारामतीत अजित पवार गटाची भव्य सभा होणार

You may have missed