Adoptech 2024 | अडॉपटेक 2024 परिषदेचे आयोजन दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशनच्या वतीने एक दिवसीय परिषद

Adoptech 2024

पुणे : Adoptech 2024 | जगभरात प्रिंटिंग तंत्रज्ञानात झपाट्याने क्रांतीकारक बदल होत आहेत. त्या बदलत्या तंत्रज्ञानाशी मैत्री करण्यासोबतच तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशनच्या वतीने एक दिवसीय अडॉपटेक २०२४ परिषदेचे आयोजन केले आहे. ही परिषद २४ ऑगस्टला शनिवारी सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत पुणे स्टेशन परिसरातील शेरेटन ग्रैंड हटिलमध्ये पार पडणार आहे. प्रिंटिंग क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्या, मोठमोठे प्रिंटर्स व्यावसायिक, प्रिंटिंग क्षेत्रातील नव्या संधी, चालू घडामोडी, प्रिंटिंगमध्ये होणाऱ्या तंत्रज्ञानातील क्रांतीबद्दल परिषदेत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

सर्व मुद्रक बंधूना सप्रेम नमस्कार, यावर्षीही आपण अडॉपटेक २०२४ परिषदेचे आयोजन केले आहे. त्यासाठी आपण सर्वांनी लवकरात लवकर बुकींग करणे आवश्यक आहे. शनिवारी (दि. २४ ऑगस्ट) रोजी परिषद होणार असून, त्याची नोंदणी फी ३ हजार रूपये आहे. त्यामध्ये सकाळचा चहा-नाष्टा, दुपारचे व रात्रीचे जेवण दिले जाणार आहे. परिषदेत नामांकित वक्त्यांकडून आपल्याला मार्गदर्शन केले जाणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी उद्योजकांनी परिषदेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. परिषदेत अनिल लांबा, प्रिया कुमार, प्रिंट वीकचे संपादक रामू रामनाथन, नामांकित वक्ते एस. एन. वेंकटरामन हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

परिषदेत खालील मान्यवर वक्त्यांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे

■ एकदिवसीय परिषदेत अनिल लांबा यांच्याकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यांनी आतापर्यंत चार खंडातील लाखो अधिकारी, व्यावसायिकांसह, अनेकांना वित्त व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले आहे. जागतिक पातळीवर प्रशिक्षण देणाऱ्यांपैकी ते एक महत्वाचे वक्ते आहेत.

  • प्रिया कुमार नामांकित प्रेरणादायी मार्गदर्शक असून, त्यांची आतापर्यंत १६ प्रेरणादायी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ४४ आंतरराष्ट्रीय पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. तब्बल ५० देशांमध्ये त्यांनी २ हजारांवर प्रेरक भाषणे केली आहे.
  • मुद्रण क्षेत्रातील प्रिंटवीक या प्रसिद्ध मासिकाचे संपादक श्री रामू रामनाथन हे दोन मुलाखती घेणार आहेत. विशेषतः त्यामध्ये जर्मनीतील डुपा प्रदर्शनात भाग घेतलेल्या भारतीय मशिनरी उत्पादकांचा सहभाग आहे. मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, डुपा प्रदर्शनात परदेशी मशिनरींचा आपल्या भारतीय मुद्रण व्यावसायिकांना होणारा फायद्याबद्दल चर्चा घडवून आणणार आहेत.

■ आयटीसीचे प्रमुख व नामांकित वक्ते एस. एन. वेंकटरामन हे परिषदेत उपस्थित राहणार असून,
ते पेपरबोर्ड आणि स्पेशालिटी पेपर्स व्यावसायाशी संबंधित आहेत. २०२२ मध्ये त्यांनी आयटीसी पॅकेजिंग व प्रिटींग व्यवसायाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी मार्केटींग, मटेरियलमध्ये पदे भूषवली आहेत. ते आपल्याला प्रिटींग क्षेत्रातील घडामोडीबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

संस्थेचे संचालक आपल्या सर्वांसाठी सातत्याने चांगली भूमिका घेउन सदैव कार्यरत आहेत.
आजच्या काळात नवनवीन गोष्टींचे आकलन महत्वाचे असून,
त्यादृष्टीने सभासदांना काहीतरी नवीन तंत्रज्ञाना व माहिती देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
ही एकदिवसीय परिषद यशस्वी करण्याची आपली जबाबदारी असून,
आपण मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग व्हाल, अशी अपेक्षा आहे.
याबाबत कोणतीही शंका असल्यास अधिक संपर्कासाठी संस्थेच्या शिक्षण समिती आणि प्रकाशनचे सचिव तीर्थराज जोशी (९८२२०२७३९४) यांच्याशी संपर्क करावा. धन्यवाद

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sunil Tatkare On Mahendra Thorve | आमदार महेंद्र थोरवेंच्या टीकेला तटकरे, अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – “महेंद्र थोरवेला मी मोजत नाही”

Pune Water Supply | पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

Shivsena Eknath Shinde Vs NCP Ajit Pawar | “राष्ट्रवादी हा विश्वासघातकी पक्ष” शिंदे गटाच्या आमदाराची टीका; महायुतीत कलगीतुरा रंगला

Amol Balwadkar Foundation | कोथरूडकर वहिनींसाठी खेळ रंगला पैठणीचा! मंगळागौर, पैठणीच्या खेळाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अमोल बालवडकर फाउंडेशनच्या उपक्रमाने भगिनी गहिवरल्या

Amol Balwadkar Foundation | धागा मायेचा, वीण विश्वासाची…! अमोल बालवडकर यांना हजारो महिलांनी बांधली राखी; अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन

Congress Mohan Joshi | शिवाजीनगर एसटी स्थानक १५ दिवसांत पूर्ववत जागी आणा; अन्यथा मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू – माजी आमदार मोहन जोशी

You may have missed