Ahmednagar Lok Sabha MockPoll | सुजय विखेंनी आक्षेप घेतलेल्या 40 मतदान केंद्रावर होणार ‘मॉकपोल’; निवडणूक आयोगाचे आदेश

Sujay Vikhe Patil Nilesh Lanke

नगर : Ahmednagar Lok Sabha MockPoll | अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. यामध्ये एकीकडं भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे (Sharad Pawar NCP) उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यामध्ये लढत झाली होती. यामध्ये निलेश लंके यांचा अवघ्या २९ हजार मतांची विजय होऊन ते खासदार बनले होते.

लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या सुजय विखे पाटील यांनी काही मतदान केंद्रावर गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. त्यानुसार या केंद्रावरील मतांची पुन्हा मोजणी करण्याची मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर आक्षेप घेण्यात आलेल्या या ४० मतदान केंद्रावर मॉकपोल घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक आयोगाला दिल्या आहेत. (Ahmednagar Lok Sabha MockPoll)

४ जूनला मतमोजणी पार पडल्यानंतर १० जून रोजी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील ४० मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशिनची आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी व्हावी असा अर्ज पराभूत उमेदवार सुजय विखे पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे केला होता.

यापार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला काल एक पत्र लिहून
पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार इथं आता मॉकपोल होणार आहे.
पण आता ही प्रक्रिया नेमकी कधी पार पडते हे पहावं लागणार आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | वडगाव शेरी, धानोरी भागातील पूरग्रस्तांचे सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई देणार;
आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

Pune Crime News | पुणे: येरवड्यात पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराची ‘गेम’; कोयत्याने वार करुन खून करणाऱ्या तिघांना अटक

Eknath Shinde – Ashadhi Ekadashi | ‘पुढच्या वर्षी मीच मुख्यमंत्री म्हणून येणार की नाही… ‘ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

You may have missed