AI Camera On Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आयटीएमएस प्रणाली कार्यान्वित, आता एआय कॅमेरे ठेवणार वाहनांवर बारीक लक्ष

मुंबई : AI Camera On Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अतिवेगामुळे अनेकांचा अपघातात बळी गेला आहे. याशिवाय असंख्य लोक जखमी झाले आहेत. अशा अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि वाहतुकीचे नियम पाळले जावेत, यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आयटीएमएस प्रणाली (ITMS system) कार्यान्वित केली आहे. या प्रणाली अंतर्गत बसवलेले एआय कॅमेरे एक्स्प्रेस वेवरील वाहनांवर करडी नजर ठेवणार आहेत.
ही आयटीएमएस यंत्रणा वाहतुकीच्या १७ प्रकारच्या नियमांच्या उल्लंघनावर लक्ष ठेवणार आहे. या प्रणाली अंतर्गत आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर आधारित कॅमेरे आणि रडार यंत्राद्वारे तत्काळ दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होताच थेट दंडाची पावती वाहनमालकाच्या मोबाईलवर येईल.
आयटीएमएससाठी लोणावळ्यातील कुसगाव येथे कमांड कंट्रोल सिस्टम आणि डाटा सेंटर उभारले असून लवकरच बोरघाट पोलिस चौकी भागात पाहणी केंद्र उभारले जाणार आहे. तळेगाव आणि खालापूर येथील टोलनाक्यांवर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम उभारण्याचे काम सुरू आहे. ही यंत्रणा ऑक्टोबरपर्यंत सुरू होईल. त्यानंतर संपूर्ण एक्स्प्रेस वेवर ऑक्टोबर २०२४ पासून आयटीएमएस यंत्रणा सुरू होईल.
ओव्हरस्पीडिंग, सीट बेल्टचा वापर न करणे, महामार्गावर गाड्या उभ्या करणे, बोगद्यात गाडी उभी करणे,
महामार्गावर दुचाकी चालविणे, लेनचे नियम तोडणे, मोबाईलवर बोलत गाडी चालवणे, टेल लाइट रिफ्लेक्टर नसलेले वाहन, अनधिकृत नंबर प्लेटचा वापर, क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक, आदीवर एआय कॅमेरे लक्ष ठेवणार आहेत.
याबाबत माहिती देताना एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड (Anilkumar Gaikwad)
यांनी सांगितले की, आयटीएमएस यंत्रणेमुळे नियम तोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे शक्य होईल.
तसेच एक्स्प्रेस वेवरील वाहतूक सुरक्षित होण्यास मदत होणार होईल.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | बँकेच्या एटीएम मशीनमधील रोकड नेली चोरुन; चावीने एटीएम उघडून केली चोरी
Pune Court Crime News | पोटच्या मुलाच्या खुन केल्या प्रकरणी पित्याची निर्दोष मुक्तता