Aids and Sexual Health Awareness Camp Budhwar Peth Pune | पुणे : बुधवार पेठ येथे एड्स व लैंगिक आरोग्य जनजागृती मेळावा संपन्न
पुणे : Aids and Sexual Health Awareness Camp Budhwar Peth Pune | जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधत जिल्ह्यात जनजागृतीपर पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून औंध रुग्णालयाचे एडस् प्रतिबंध व नियंत्रण विभाग व पुणे शहर एड्स कंट्रोल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार पेठ रामेश्वर मार्केट येथे लक्षगट भगिनीकरीता एड्स व लैंगिक आरोग्य जनजागृती करीता मेळावा आयोजित करण्यात आला.
यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुधीर सरवदे एडस् संसर्गितांचे मूलभूत हक्क प्रदान करणारा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कायदा, लैंगिक आरोग्य आदीबाबत माहिती दिली. यावेळी उपस्थित महिलांच्या शंकाचे निरसन करण्यात आले.
पुणे शहर एड्स नियंत्रण सोसायटीचे कर्मचारी, आयसीटीसी व डीएसआसी विभाग ससून रुग्णालय, सोनावणे रुग्णालय, दळवी रुग्णालय, औंध रुग्णालयाचे कर्मचारी, जॉन पॉल स्लम डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, मंथन फाउंडेशन, रिलीफ फाउंडेशन या अशासकीय संस्थेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. (Aids and Sexual Health Awareness Camp Budhwar Peth Pune)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Uday Joshi Arrest | भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी याला अटक;
निनाद नागरी सहकारी पतसंस्थेत केली होती 1 कोटी 79 लाख रुपयांची फसवणूक
Pune Pimpri Chinchwad Crime News | गाडीला धक्का लागल्याने नुकसान भरपाईसाठी केले अपहरण;
फोन पे द्वारे घेतले 10 हजार रुपये
Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणींना डिसेंबर- जानेवारी महिन्याचे 3000 रुपये एकत्रित मिळणार;
पैसे खात्यात कधी जमा होणार? जाणून घ्या