Ajit Gavhane | पिंपरी चिंचवड: अजित गव्हाणे यांनी दिला शहराध्यक्ष पदाचा राजीनामा; अजित पवार यांना धक्का

Ajit Pawar-Ajit Gavhane

चिंचवड : Ajit Gavhane | आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पक्षीय नेत्यांची तयारी सुरु झाल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आज शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे. वैयक्तिक कारणाने आपण राजीनामा देत असल्याचे गव्हाणे यांनी म्हंटले आहे.

चिंचवड आणि भोसरीला भाजप आमदार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांनाच संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमधील अनेकांना राजकीय भवितव्याची चिंता आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अजित गव्हाणे यांनी मागेच शरद पवार यांची भेट घेतली होती, त्यात शरद पवार यांनी सर्वांसाठी दरवाजे खुले ठेवण्याची घोषणा केली होती. पिंपरी चिंचवड शहरात पुढील काही दिवसात शरद पवारांची सभा होत आहे. या सभेनंतर पिंपरी चिंचवडचे राजकीय चित्र आणखी बदलू शकते असे राजकीय जाणकार सांगत आहेत.

गव्हाणे यांनी आज शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
त्यांच्यासोबत शहर कार्याध्यक्ष राहुल भोसले, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष यश साने
आणि भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर यांनीही राजीनामे दिले आहेत.
आता हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. (Ajit Gavhane)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Mumbai-Pune Expressway Accident | पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; 5 ठार, 42 जखमी

ACB Trap On Policeman (ASI) | लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | पुणे: खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक

Police Sub Inspector (PSI) Dismissed In Pune | पुणे : 3 लाखांची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक पोलीस सेवेतून बडतर्फ

You may have missed