Ajit Pawar | अजित पवारांची मोठी घोषणा; विधानसभा एकत्र मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार

Ajit-Pawar

पुणे : Ajit Pawar | पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा (NCP Melava In Pune) आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका (Municipal Corporation Elections) स्वबळावर लढविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महायुती (Mahayuti) केवळ विधानसभेपुरतीच (Maharashtra Assembly Election 2024)असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात राजकीय पक्ष स्वतंत्र मैदानात उतरणार असल्याचे समोर आलं आहे.

अजित पवार म्हणाले, ” आज पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad), पुणे शहर आणि ग्रामीण असे मेळावे घ्यायचे होते, पण ग्रामीण भागातील मेळावा होऊ शकला नाही. आज जे सर्व गुरू आहे, त्या गुरूंना वंदन करतो. काही अफवा पसरवल्या जात आहेत पण अफवांवर विश्वास ठेवू नये. आज जो काही निर्णय घेतला आहे तो विकासासाठी घेतला आहे.

विरोधी पक्षात राहून आंदोलन करून विकास होत नाही, तसेच प्रश्न सुटत नाहीत. आज पक्षातून काहीजण गेले. जे गेले आहे ते स्वतंत्र आहेत. आपल्याला पुणे शहरात जोमानं काम करावं लागणार आहे. वेळ फार कमी आहे. आपल्या सगळ्या नेत्यांनी निर्णय घेतला आणि इथपर्यंत पोहचलो आहे. (Ajit Pawar)

एक असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, विधानसभा निवडणुका
या ऑक्टोबरच्या शेवटापर्यंत किंवा नोव्हेंबरच्या पहिला आठवड्याला होणार आहे.
तसेच पुण्यात राज्यातील सर्वांत मोठं एक दिवसीय शिबीर घ्यायचं आहे.
त्याच बालेवाडी येथे बुकिंग करण्याचं कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.
लोकसभा- विधानसभा आपण एकत्र लढत असलो,
तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आपण स्वबळावर लढायच्या आहेत,” असेही अजित पवार यांनी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Attack On Digital Content Creator Lady | पुण्यामध्ये भररस्त्यात महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करणारा अटकेत

BJP Executive Meeting In Pune | केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत पुण्यात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महाअधिवेशन सुरु

Manorama Khedkar | पोलीस कोठडीत देखील पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकरचा रुबाब कमी होईना! जेवण बेचव असल्याची तक्रार

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीत भाजपच ‘दादा’; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 40 जागात गुंडाळणार?