Ajit Pawar At Bhau Rangari Ganpati | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे घेतले दर्शन; पुनीतदादा बालन यांच्या कार्याचे केले कौतुक (Videos)

Ajit Pawar-Punit Balan

पुणे: Ajit Pawar At Bhau Rangari Ganpati | ढोल-ताशा पथकांचा निनाद, बँड पथकाचे मधूर सूर, नगारावादनासह सनई-चौघड्यांचे मंजूळ सूर, ‘मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष, पारंपरिक पेहरावातील कार्यकर्त्यांचा उत्साह अशा उत्सवी वातावरणात राज्यभर गणेशोत्सव साजरा केला जात आहे. (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati)

https://www.instagram.com/reel/C_vLBeLpYCp/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.१०) श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पुनीतदादा बालन (Punit Balan) यांच्या कार्याचे कौतुकही केले. माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, “खरंतर मी मधल्या काळात पुनीत बालन यांनी लक्ष देऊन ज्या पद्धतीने हेरिटेजचे काम झाले, मी स्वतः त्याचे काम बघितले, मला ते मनापासून आवडलं.

https://www.instagram.com/p/C_u-HZMpjqO

आपल्या पूर्वजांनी आपल्या बापजाद्यांनी काही गोष्टी त्याकाळात सुरु केलेल्या आहेत. त्या पुढे तशाच पद्धतीने जतन झाल्या पाहिजेत. त्यावेळचे लाकूड, किंवा हेरिटेजचे कोरीव काम वैगरे तसंच ते ठेवलं गेलं पाहिजे या मताचा मी नेहमी राहिलो आहे.

https://www.instagram.com/p/C_unglVpVLL

मधल्या काळात मी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात भेट दिली. ज्यावेळी काही गोष्टी बघितल्या त्या खरोखरच सर्व पुणेकरांना महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशा पद्धतीच्या आहेत. त्यामुळे भाविकही मोठ्या प्रमाणावर येत असतात. ही एक चांगली परंपरा आहे, जातीय सलोखा निर्माण होतो, एकोपा निर्माण होतो, सर्वजण आनंदाने या उत्सवात सहभागी होतात, असेही अजित पवार म्हणाले.

https://www.instagram.com/p/C_ms6AoJzuD

You may have missed