Ajit Pawar At Narayanpur | उपमुख्यंत्री अजित पवार यांनी नारायणपूर येथे जाऊन वाहिली; श्रीसदगुरु नारायण महाराजांना भावपूर्ण आदरांजली

मुंबई : Ajit Pawar At Narayanpur | पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणपूर येथील श्रीसदगुरु नारायण महाराज यांचं नुकतच निधन झालं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नारायणपूर येथे भेट देऊन श्री सद्गुरु नारायण महाराजांच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली तसेच अनुयायांची भेट घेऊन सांत्वन केले.
“सद्गुरु नारायण महाराजांचे निधन ही महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, पुरोगामी, सुधारणावादी चळवळीची मोठी हानी आहे. अध्यात्माच्या माध्यमातून लोकजागृती, लोकजागृतीतून लोकचळवळ, लोकचळवळीतून सामाजिक सुधारणा, पुरोगामी विचार गावोगावी पोहचवले. श्रीसदगुरु नारायण महाराजांचे विचार आणि सेवाकार्य सर्वांनी मिळून पुढे नेणं. सामुदायिक शेती, सामुदायिक विवाह, सामुदायिक श्रमदान, व्यसनमुक्तीचे त्यांचे कार्य अखंडीतपणे कायम ठेवणं हीच श्रीसदगुरु नारायण महाराजांना खरी आदरांजली ठरेल,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन आदरांजली वाहिली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा