Ajit Pawar | बारामती होस्टेल सून्न ! गोखलेनगरमध्ये उर्त्स्फुत बंद

Ajit Pawar | Baramati Hostel is closed! Urtsfut closed in Gokhalenagar

पुणे : Ajit Pawar |  उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यातील निवडणुकीची सुत्रे ज्या वास्तूमधून हलवितात, ते बारामती होस्टेल अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच सुन्न झाले. येथील सर्व प्रमुख पदाधिकारी सकाळीच बारामतीला रवाना झाले. याचवेळी गोखलेनगर येथील दुकानदार, टपरीचालक यांनी उर्त्स्फुतपणे बंद पाळलेला दिसून आला.

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे गोखलेनगरमधील बारामती होस्टेल येथील गेस्ट हाऊसमधून आपली राजकीय सुत्र हलवित असत. अजित पवार यांनी पुणे महापालिकेच्या उमदेवारांसाठी इच्छुकांच्या येथेच मुलाखती घेतल्या आणि उमेदवारांना येथूनच एबी फॉर्म देण्यात आले होते. महापालिका निवडणुकीतील विजयाचा गुलाल येथील रस्त्यावर अजूनही दिसून येतो. अजित पवार येथे असले की या संपूर्ण परिसरात मोठी चहलपहल पहायला मिळत असत. कार्यकर्त्यांच्या गाड्यांनी परिसरात अनेकदा वाहतूक कोंडी होत असे. पण, आज या सर्व परिसरात भयाण शांतता दिसून येत होती. पत्रकारनगरसमोरील टपरीचालकांनी आपली दुकाने बंद ठेवल्याचे संपूर्ण परिसरात  दु:खद वातावरण दिसून येत होते.

बारामती होस्टेलमध्ये राहणारी मुले या बातमीने सुन्न झाली. सहा दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी बारामती होस्टेल येथे भेट दिली होती. त्यावेळी ज्यांनी भेट घेतली होती. त्यांना या वृत्ताने मोठा धक्का बसल्याचे दिसून येत होते़.

You may have missed