Ajit Pawar | ‘मुख्यमंत्री करतो असं सांगितलं असतं तर शिंदेंआधी मीच पूर्ण पक्ष घेऊन आलो असतो’ – अजित पवार
ठाणे: Ajit Pawar | ठाणे येथे आयोजित ‘योद्धा कर्मयोगी – एकनाथ संभाजी शिंदे’ (Eknath Sambhaji Shinde) या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या मिश्किल भाष्याने सभागृहात हशा पिकला. भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उद्देशून अजित पवार म्हणाले, ” जेव्हा तुम्ही एकनाथ शिंदे यांना सांगितलं की इतके-इतके आमदार आणल्यानंतर मुख्यमंत्री करतो, तेव्हा मलाच सांगितलं असतं तर मी अख्खा पक्षच घेऊन आलो असतो. जाऊद्या आता काय.. शेवटी हा नशिबाचा भाग असतो”, असे अजित पवारांनी भाष्य केले. (Ajit Pawar)
अजित पवार म्हणाले, ” देवेंद्र फडणवीस यांची आमदार म्हणून टर्म १९९९ ला सुरू झाली, तर एकनाथ शिंदे यांची २००० ला सुरुवात झाली. यांच्यात सर्वांत सिनियर मी आहे, माझी सुरुवात १९९० मध्ये झाली. तरी मी मागे राहिलो, मला जर संधी दिली असती तर मी पूर्ण पार्टी आणली असती.
त्यांनी तर फक्त आमदारच आणले. आता वेळ निघून गेली. मी अनेक मुख्यमंत्री बघितले. परंतु इतका माणसात मिसळून काम करणारा मी नाही पाहिला. कधी कधी मीच वैतागतो ही कॅबिनेट आहे की काय..?”, अशा शब्दात अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक केले.
“राज्यपालांनी पदभार स्वीकारल्यानंतर हा प्रथमच कार्यक्रम होत आहे. या ठाण्याच्या नगरीत खूप काही घडले आहे. त्यातून एका शेतकरी कुटुंबाचा मुलगा येतो, कामाला सुरुवात करतो, नगरसेवक होतो आणि त्यानंतर मागे वळून न पाहता काम करत राहतो. त्याची जिद्द होती चिकाटी होती.
अनेक संकटे त्यांनी आतापर्यंत झेलली. पुस्तकात शिंदे यांचे गुरू बाळासाहेबांचा फोटो
व दिघेंचा फोटो हवा होता असे माझे मत आहे. या पुस्तकात प्रेमळ आजोबा दिसला नाही,
लेखकाने माझं मत, माझा सल्ला घ्यायला हवा होता,” असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
डॉ. प्रदीप ढवळ यांनी लिहिलेल्या ‘योद्धा कर्मयोगी – एकनाथ संभाजी शिंदे’
या पुस्तकाचे प्रकाशन काल सायंकाळी (दि.७) राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्या हस्ते गडकरी रंगायतन सभागृह, ठाणे येथे पार पडले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sinhagad Road Pune Flood | डोळ्यांदेखत बुडाला संसार; सिंहगड रस्त्यावरील पुरात कुटुंबाचे नुकसान
Pune Crime News | गटारीला जेवायला घालून कोयत्याने डोक्यात वार करुन केले गंभीर जखमी
Murder Due To Immoral Relationship | अनैतिक संबंधाच्या संशयावरून गुप्तीने भोसकून तरुणाचा खून
Pune Crime Court News | अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्या प्रकरणी बॅंक कर्मचाऱ्याला जामीन मंजूर