Ajit Pawar | आळंदी नगरपरिषद शाळेच्या नवीन इमारत बांधकामास अधिकचा निधी दिला जाईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

Ajit Pawar

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आळंदी परिसरात विविध विकास कामांचे भूमिपूजन

पुणे : Ajit Pawar | आळंदी नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक ४ च्या नवीन इमारतीच्या बांधकामाला अधिकचा निधी दिला जाईल, असे सांगून अधिकच्या निधीचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

शाळा क्रमांक ४ च्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी पवार बोलत होते. यावेळी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी जि.प.अध्यक्षा निर्मला पानसरे, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, तहसीलदार ज्योती देवरे, आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, शिक्षणाधिकारी शिल्पा रोडगे, नगरपरिषदेचे माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, नगरपरिषद शाळा क्रमांक ४ येथील मनुष्यबळाची कमतरता अन्य ठिकाणच्या जास्तीच्या पदातून भरून काढली जाईल. या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे, असे सांगून नवीन इमारतीचे बांधकाम उच्च दर्जाचे करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

ते पुढे म्हणाले, संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांचे विचार सर्व जाती धर्माला, वारकरी संप्रदायाला पुढे घेऊन जाणारे आहेत. जिल्ह्यात अनेक महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आहेत. लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविक आणि स्थानिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची सर्वांनीच दक्षता घ्यावी.

शासनातर्फे गोरगरीब वर्गासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय झाली असून राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला. युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली. शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना यासारख्या कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

आळंदी येथील इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूट येथील कर्करोग जनजागृती कार्यक्रम समारंभ
प्रसंगी बोलताना श्री. पवार म्हणाले या रुग्णालयामार्फत आळंदी शहरात
कर्करोग जनजागृती आणि सर्वेक्षण अतिशय चांगल्या प्रकारे राबविले जात आहे.
शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या ठिकाणी चांगल्या प्रकारे राबविली जात असून
समाजातील गोर गरीब रुग्णांवर या हॉस्पिटल मध्ये उपचार केले जातात.
या रुग्णालयाला जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून १० कोटी रुपयांची मदत देण्यात येईल,
असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले,
रुग्णालयाचे प्रमुख डॉ. संजय देशमुख, विश्वस्त मुकुंद देशपांडे आदी उपस्थित होते.

विविध विकास कामांचे भूमिपूजन

पवार यांच्या हस्ते आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक ४ इमारत बांधकाम,
आळंदी मरकळ रस्त्याचे भूमिपूजन, इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूट येथील कर्करोग जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच चाकण येथील उप जिल्हा रुग्णालय आणि अधिकारी कर्मचारी निवासस्थानाचे भूमिपूजन करण्यात आले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed