Ajit Pawar NCP | लोकसभा सचिवालयाकडून अजित पवार गटाला कार्यालयच नाही!

पुणेरा आवाज – Ajit Pawar NCP | लोकसभा सचिवालयाकडून राजकीय पक्षांना त्यांच्या त्यांच्या कार्यालयाचं वाटप करण्यात आलं. खासदार संख्येच्या आधारे हे वाटप करण्यात आलं. ज्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला तर कार्यालयही देण्यात आलेलं नाही. उलट यामध्ये शरद पवार (Sharad Pawar NCP) यांच्या पक्षाचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असा न करता राष्ट्रवादी काँग्रेस असा करण्यात आला. तर एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्त्वाखालील कार्यालयाचा उल्लेख शिवसेना शिंदे (Shivsena Shinde Group) असा केला. या दोन्ही घटनांमुळे सध्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. नऊ खासदार असलेल्या उद्धव ठाकरे गटाना लोकसभा सचिवालयाकडून स्वतंत्र कार्यालय देण्यात आलं आहे.
शिवसेनेत बंडखोरी करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळवलं होतं. केंद्रीय निवडणूक आय़ोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील पक्षाला मूळ शिवसेना सांगितलं आणि त्यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे यांना दिलं. त्यानंतर अजित पवार राष्ट्रवादीत बंडखोरी करत महायुतीत आले. एकनाथ शिंदेंप्रमाणे अजित पवारांनीही पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळवलं. मात्र, लोकसभेच्या निकालात या दोन्ही पक्षांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. जो निकाल लागला तो अत्यंत धक्कादायक होता. शरद पवार गट शरद पवार गटाने लोकसभेत ८ जागांवर विजय मिळवला. तर अजित पवार गटाला फक्त एक जागा जिंकता आली.
आता लोकसभा सचिवालयाने कार्यालयांचं वाटप करताना शरद पवार यांच्या पक्षाचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेस, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा उल्लेख शिवसेना शिंदे असा केला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा