Ajit Pawar | ठाकरे-फडणवीस वादात अजित पवारांची उडी; म्हणाले – ‘आता एकमेकांचे कपडे काढायचं बाकी…’

Ajit Pawar-Devendra Fadnavis-Uddhav Thackeray

बारामती : Ajit Pawar | मागील काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. पुण्यात पार पडलेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचा उल्लेख ढेकूण, टरबूज असा केला. तसेच अमित शहांवर (Amit Shah) निशाणा साधताना त्यांचा उल्लेख अहमदशाह अब्दाली असा केला. या ठाकरे फडणवीस वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. ते बारामतीतील सांगवी गावात बोलत होते. (Baramati News)

अजित पवार म्हणाले, ” मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालो आहे. मी फक्त विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहे. फाफटपसारा सांगणार नाही, पण आता कोण कुणाला ढेकूण म्हणत आहेत. एकमेकांचे कपडे काढायचं बाकी ठेवतात. सत्ताधारी आणि विरोधकांनी लक्ष घालण्याची गरज आहे. (Ajit Pawar)

पाच ते सहा वेळा एफआरपी वाढला पण एमएसपी वाढला नाही. ४० रुपयापर्यंत साखरेचे दर करून द्या, अशी मागणी आम्ही केली आहे. वाढवणजवळ आम्ही विमानतळ करणार आहोत “, असे अजित पवार त्यांच्या भाषणात म्हणाले. दरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे.

“आता लढाई मैदानात आहे, मी मुंबईत म्हणालो की एक तर मी तर राहीन किंवा तू तरी राहशील. इथे एक पोस्टर लागलंय. त्यातील फोटोत माझ्या पायाशी एक कलिंगड ठेवलंय. काहींना वाटलं की मी त्याला आव्हान दिले आहे. पण, ढेकणांना आव्हान द्यायचं नसतं तर बोटाने चिरडायचं असतं.

मी आव्हान द्यावं इतका मोठा तू नाहीस. काहीजणांना वाटलं की मी त्याला आव्हान दिले आहे. तर हे आव्हान चोर-दरोडेखोरांच्या पक्षाला आहे”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती.

तर त्याला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले होते की,” उद्धव ठाकरेंच्या डोक्यावरचा ताबा सुटला आहे.
ते अत्यंत निराशेत आहेत. त्या निराशेतून ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहेत त्यावर आपण काय उत्तर द्यायचं?
फर्स्टेशनमध्ये जो माणूस डोकं बिघडल्यासारखा बोलतो त्याला उत्तर द्यायचं नव्हतं.

मात्र भाषण करुन उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं जे अमित शाह म्हणाले होते. अमित शाह त्यांच्याबद्दल म्हणाले होते की ते औरंगजेब फॅन क्लबचेच सदस्य आहेत. उद्धव ठाकरेंनी भाषण करुन ते दाखवून दिलं “, असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Gold-Silver Rate Today | सणासुदीची चाहूल लागल्याने सोने महागले, 70 हजारच्या जवळ पोहोचली किंमत, जाणून घ्या 22-24 कॅरेटचा दर

Sachin Waze On Anil Deshmukh | सचिन वाझेंचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप; म्हणाले – ‘त्यांच्या पीएमार्फत ते …’

Nashik Phata To Khed Elevated Corridor | केंद्र सरकारकडून पुण्याला मोठी भेट! नाशिकफाटा- खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी

Rohit Pawar NCP (SP) | रोहित पवारांना लागले मंत्रिपदाचे वेध?

Pune Court Crime News | शाळेत शिक्षिकेकडे वाईट नजरेने पाहत तिचा विनयभंग करणाऱ्या उपमुख्यध्यापकाला 2 वर्षे कारावासाची शिक्षा

Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभेसाठी शरद पवार गटाचे उमेदवार ठरले? यात्रा काढत मतदारसंघात करणार शक्तिप्रदर्शन

Malhar Peth Police Station | मल्हारपेठ पोलिसांनी चोरी झालेले 3 लाख 73 हजार रुपये किंमतीचे 17 मोबाईल केले हस्तगत

Devendra Fadnavis | ‘दिल्लीच्या राजकारणात जाणार की महाराष्ट्रात ?’ फडणवीस म्हणाले – ‘राजकारण हा अनिश्चिततेचा निश्चित खेळ त्यामुळे…”

You may have missed