Ajit Pawar NCP | अहिल्यानगर जिल्ह्यात अजित पवारांना मोठा झटका; उमेदवारीचा शब्द पाळला नाही म्हणत बड्या नेत्याचा राष्ट्रवादीला रामराम
अहिल्यानगर: Ajit Pawar NCP | राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे (Anuradha Nagawade) व प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे (Rajendra Nagawade) यांनी पक्षाच्या सर्व पदे व सदस्यांचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांनीही आपले राजीनामे दिलेले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना हा मोठा धक्का समजला जात आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी अनुराधा नागवडे यांना उमेदवारी देण्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र महायुतीकडून आमदार बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते (Pratibha Pachpute) यांना उमेदवारी जाहीर झाली. यामुळे नागवडे यांनी अजित पवार यांची साथ सोडली आहे. (Ajit Pawar NCP)
मागील आठवड्यातच शरद पवार (Sharad Pawar) तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) व काँग्रेस पक्षाचे नाना पटोले (Nana Patole) यांच्या भेटी घेऊन महाविकास आघाडीकडून उमेदवारीची मागणी नागवडे केली होती. त्यामुळे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात (Shrigonda Assembly Constituency) महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे.’
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जाणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. या दोन्ही पक्षांनी या जागेवर आपला दावा सांगितला आहे.
शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश करून मशाल या चिन्हावर लढण्यासाठी अनुराधा नागवडे यांनी पूर्ण तयारी केली आहे . तर शरद पवार यांच्या पक्षाकडून माजी आमदार राहुल जगताप (Rahul Jagtap) हे देखील प्रबळ दावेदार आहेत.
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Mumbai High Court News | ’50 खोके एकदम ओके’ ची घोषणा गुन्हा नाही, हायकोर्टाने फटकारले;
सरकारने अपेक्षा भंग केल्यास उद्रेक तर होणारच – हायकोर्टाचे निरीक्षण
Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?