Ajit Pawar NCP Leader On Nitesh Rane | महायुतीत वादंग! राष्ट्रवादीच्या आमदाराची देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार; नितेश राणेंवर कारवाई करण्याची मागणी

मुंबई: Ajit Pawar NCP Leader On Nitesh Rane | राष्ट्रवादी काँग्रेसचा जो मूळ मतदार आहे, त्यामध्ये अल्पसंख्याक समुदायाचा (Minority Community) समावेश आहे. अजित पवार आपल्या भाषणांमधून वारंवार आपण अल्पसंख्याक समाजाच्या बाजूने आहोत, असा विश्वास देत असतात.
मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये भाजप नेते नितेश राणे यांच्याकडून सातत्याने मुस्लीम समाजाला अंगावर घेणारी वक्तव्यं आणि आव्हान देण्याची भाषा केली जात आहे. अजित पवार हे भाजपसोबत सत्तेत आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांच्या मुस्लीम समाजाविषयीच्या वक्तव्यांबाबत अजित पवार यांची भूमिका काय, असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे.
दरम्यान आता भाजपचे आमदार नितेश राणे वारंवार धार्मिक द्वेष वाढवणारी करणारी वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची चौकशी करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. सतीश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र देखील लिहिले आहे. त्यामुळे महायुतीत (Mahayuti) वादाची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे.
राज्यात येत्या दोन महिन्यात विधानसभेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर केवळ स्वत:चे राजकारण करण्यासाठी भाजपचे आमदार नितेश राणे सातत्याने मुस्लिम समाजाबद्दल आणि त्यांच्या धार्मिक स्थळाबाबत वादग्रस्त वक्तव्ये करीत आहेत, असा आरोप आमदार सतीश चव्हाण (MLA Satish Chavan) यांनी केला आहे.
पत्रात म्हटले आहे की, आमदार राणे यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत. तसेच भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने देखील त्यांच्या समाजविघातक वक्तव्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Prisha Tapre | प्रिशाने अवघ्या 16 व्या वर्षी पार केली इंग्लिश खाडी!