Ajit Pawar NCP-Mahayuti | अजित पवार महायुतीत छोटा भाऊ होण्यास तयार; कमी जागांच्या बदल्यात अटी काय?; जाणून घ्या

Devendra Fadnavis-Eknath Shinde-Ajit Pawar

पुणे : Ajit Pawar NCP-Mahayuti | लोकसभा निवडणुकीत महायुतीतून निवडणूक लढल्यानंतर अजित पवार गटाला अपेक्षित यश मिळाले नाही. बारामती लोकसभा मतदारसंघातही (Baramati Lok Sabha) अजित पवारांना मोठा धक्का बसला. सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar) यांचा पराभव केला. यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) जागावाटपाबाबत महायुतीत चर्चा सुरु आहे. सध्याच्या घडीला भाजपचे राज्यात १०३ आमदार आहेत. तर शिवसेनेचे ४० आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ३९ आमदार आहेत.

जागावाटपात अजित पवार लहान भावाची भूमिका स्वीकारण्यास तयार असल्याची माहिती मिळत आहे. विधानसभेनंतर महायुतीची सत्ता आल्यास मला उपमुख्यमंत्रिपदी कायम ठेवा, अर्थमंत्रीपद द्या. आम्ही जागांवर तडजोड करतो, अशा अटी अजित पवारांनी घातल्या असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसेच काही माध्यमांनी तसे वृत्त प्रकाशित केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महायुती आगामी लोकसभा निवडणूका लढवणार आहे. महायुतीनं विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा सुरु केली आहे. भाजप १४० पेक्षा अधिक जागा लढवण्याची शक्यता आहे. तर शिंदेसेनेला ८० ते ९० जागा सुटू शकतात. लोकसभा निवडणुकीत फटका बसलेला भाजप विधानसभेसाठी आक्रमक पवित्रा घेणार असल्याचं चित्र आहे.

ऑक्टोबरच्या मध्यानंतर राज्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.
लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा समावेश महायुतीत होऊ शकतो
त्यांना १२ ते १८ जागा दिल्या जाऊ शकतात.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Reliance Retail | अनंतच्या विवाहापूर्वी नवीन बिझनेस सुरू करण्याची तयारी,
‘या’ व्यवसायात एंट्री करणार मुकेश अंबानी, चीनची कंपनी आणणार भारतात

Pune Crime News | पुणे: गाडीत बसण्यास नकार दिल्याने अश्लील शिवीगाळ करुन असभ्य वर्तन, एकाला अटक

Gautam Gambhir | गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाहांची घोषणा

Pune Bopodi Hit & Run Case | पुणे पोलीस हवालदार मृत्यू प्रकरण : कारमधील तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात,
कारला ओव्हरटेक केल्याचा आला राग, भरधाव वेगात कार चालवली अन्…

You may have missed