Ajit Pawar NCP | ‘आर.आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापला’, अजित पवारांकडून मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ‘फाईलवरील सही फडणवीसांनीच दाखवली’

सांगली: Ajit Pawar NCP | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी तासगावमधील सभेत बोलताना ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याच्या (Irrigation Scam Maharashtra) आरोपाबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. ज्याच्यावर एवढा विश्वास ठेवला. एवढं सहकार्य केलं. त्याच आर. आर. पाटील (RR Patil) यांनी माझा केसाने गळा कापला होता, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
अजित पवार म्हणाले, ” ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर कारवाई करण्यासाठी फाईल गृह मंत्रालयाकडे गेली होती. त्यावेळी गृहमंत्री असणारे आर. आर. पाटील यांनी माझी खुली चौकशी करावी असे सांगत फाईलवर सही केली होती.
त्यानंतर सरकार गेलं. राष्ट्रपती राजवट लागू झाली. परंतु माझ्या त्या फाईलवर राज्यपालांनी सही केली नाही. सरकार बदललं २०१४ साली देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री झाले. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कारवाई करण्यासाठी माझ्या फाईलवर सही केली.
देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बंगल्यावर बोलवून आर.आर. पाटील यांनीच तुमची खुली चौकशी करावी असे आदेश देत सही केल्याचे दाखवलं. ज्याच्यावर एवढा विश्वास ठेवला. एवढं सहकार्य केलं. त्याच आर.आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापला होता”, असा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले, ” २०१४ मध्ये विधानसभेचा निकाल लागतो न लागतो तोपर्यंतच साहेबांनी
भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. भाजपला बिनशर्थ पाठिंबा कसं काय दिलं जातं.
विचारधारा सोडून कशी मदत केली असं विचारल्यावर साहेबांनी सांगितलं
सरकार बदललं आहे मदत केली पाहिजे.
१९९९ मध्ये देखील असंच झालं होतं. सोनिया गांधी यांना विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीची स्थापना झाली.
लगेच विधानसभा निवडणुका होताच काँग्रेसला पाठिंबा दिला.
तेव्हा देखील साहेब म्हणाले सरकारमध्ये गेल्याशिवाय काम होत नाहीत.
मग मी गेलो तर काय झालं. माझं काय चुकलं”, असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा