Ajit Pawar NCP | मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना तंबी; लाडकी बहीण योजनेतील ‘मुख्यमंत्री’ शब्द वगळल्याने वाद

Ajit Pawar

मुंबई: Ajit Pawar NCP | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने तयारी सुरु केलेली आहे. पक्षाच्या वतीने जन सन्मान यात्रा (Jan Sanman Yatra) सुरु आहे. दरम्यान अजित पवारांचे पिंक पॉलिटिक्स लक्ष वेधून घेत आहे. महायुती सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक योजना जाहीर केल्या. (Ajit Pawar NCP)

त्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) राज्यभर चर्चेत आहे. मात्र राष्ट्रवादीकडून या योजनेचा प्रसार करीत असताना यातील मुख्यमंत्री शब्द काढून टाकला जात असल्याचे म्हणत शिंदे सेनेच्या नेत्यांनी यावर आक्षेप घेतला. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या नावातून मुख्यमंत्री हा शब्दच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहिरातीतून वगळल्याने गुरुवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाली.

यावरुन आता राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वाने कार्यकर्त्यांना तंबी दिली आहे. जनसन्मान यात्रा असो की पक्षाचा कोणताही कार्यक्रम, त्यात योजनेचे नाव झळकावताना त्यात मुख्यमंत्री हा शब्द दिसलाच पाहिजे अशी समज देण्यात आली आहे. निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या असताना महायुतीमध्ये पक्षामुळे काही गैरसमज पसरु नये यासाठी ताकीद देण्यात आल्याची माहिती आहे.

जन सन्मान यात्रेची जिल्ह्यातील नियोजनाची जबाबादारी त्या- त्या विभागातील नेतृत्व,
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडे असते. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा उल्लेख करताना
अनेकदा थोडक्यात बोलावे म्हणून लाडकी बहिण योजना असा केला जातो. पण, त्यात मुख्यमंत्र्यांचे नाव घ्यायचे नाही, असा काही हेतू नव्हता.

मात्र, यापुढे योजनेचे नाव पूर्ण लिहावे अशा सूचना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आल्या आहेत, असे पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणूक मुख्यमंत्र्यांच्याच नेतृत्वात लढण्यात येणार असून महायुतीतील घटकपक्षात अंतर राहणार नाही, याची काळजी राष्ट्रवादीकडून आमच्या स्तरावर घेण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed