Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बालेकिल्ल्यातच शहराध्यक्ष मिळेना;”कर्णधारच नाही तर लढायचे कोणाच्या नेतृत्वाखाली?”, कार्यकर्त्यांचा सवाल
पिंपरी: Ajit Pawar NCP | आगामी विधानसभा (Maharashtra Assembly Election 2024) तोंडावर असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाला पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) शहराध्यक्ष मिळत नसल्याची चर्चा आहे. जवळपास दोन महिन्यांपासून याठिकाणी शहराध्यक्ष पद खाली आहे. कधीकाळी शहराध्यक्षपद मिळवण्यासाठी रस्सीखेच असलेल्या राष्ट्रवादीत आता मात्र शहराध्यक्ष पद घेण्यास कोणी तयार होत नसल्याचे चित्र आहे. कर्णधारच नाही तर लढायचे कोणाच्या नेतृत्वाखाली? अशा बोलक्या प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहेत.
https://www.instagram.com/p/DAc4RxEpR04
लोकसभेला राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाल्यानंतर राजकीय भवितव्यासाठी शहराध्यक्षांसह माजी नगरसेवकांनी पक्ष सोडला. भोसरीतून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या अजित गव्हाणे यांनी १६ जुलैला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. समर्थक माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी शरद पवार पक्षात (Sharad Pawar NCP) त्यांनी प्रवेश केला. त्यामुळे हे पद आता शहराध्यक्षाविना आहे.
https://www.instagram.com/p/DAc72wopjDz
दरम्यान शहराध्यक्षपदासाठी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode), माजी महापौर योगेश बहल (Yogesh Bahal), जगदीश शेट्टी (Jagdish Shetti), नाना काटे (Nana Kate), भाऊसाहेब भोईर (Bhausaheb Bhoir) यांची नावे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुचविल्याचे सांगितले जाते. त्यांपैकी बनसोडे विधानसभा लढणार असून, बहल यांना राज्यपाल नियुक्त आमदारकी देण्याची मागणी आहे.
https://www.instagram.com/p/DAc9iwIJLJq
तर, काटे, भोईर हे चिंचवडमधून (Chinchwad Assembly) निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळेच त्यांनी शहराध्यक्ष पद स्वीकारले नसल्याचे बोलले जाते. विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाही शहराध्यक्ष निवडला जात नसल्याने पदाधिका-यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
https://www.instagram.com/p/DAc2qhLCX9O
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)