Ajit Pawar NCP News | अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड, सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग

मुंबई : Ajit Pawar NCP News | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election Results 2024) महायुतीला (Mahayuti) प्रचंड मोठे यशमिळाले आहे. महायुतीने या निवडणुकीत पहिल्यांदाच २३५ पेक्षा जास्त जागांवर यश मिळवले. यामध्ये भाजपचा (BJP) १४८ जागांपैकी १३२ जागांवर, शिंदे गटाचा (Shivsena Shinde Group) ८५ जागांपैकी ५७ जागांवर तर अजित पवार गटाचा ५१ जागांपैकी ४१ जागांवर विजय झाला आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) दारुण पराभव झाला आहे.
आता या निकालानंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार यांची सर्वानुमते पक्षाच्या गटनेतेपदी निवड केली आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यापासून भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटात बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.
आज किंवा उद्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होणार असून, येत्या एक- दोन दिवसांत सरकारचा शपथविधी सोहळाही पार पडणार आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
निकालानंतर अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत अजित पवारांची गटनेतेपदी निवड झाली आहे. (Ajit Pawar NCP News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pravin Darekar On Devendra Fadnavis | “देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील”, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य
Maharashtra Assembly Election Results | विधानसभा निवडणूक २०२४; देवेंद्र फडणवीस,
आदिती तटकरे, धनंजय मुंडे, गिरीश महाजन विजयी
Sanjay Raut On Assembly Results | ‘निकालामागे खूप मोठं कारस्थान, लोकशाहीचा कौल वाटत नाही”, संजय राऊत संतापले, म्हणाले – ‘मविआला ७५, १०० जागाही देत नसाल तर…’
Maharashtra Assembly Election Results | महाराष्ट्रात भाजप महायुतीची लाट, मविआची मोठी
पिछेहाट, लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट