Ajit Pawar NCP On Congress | अजित पवार गटाच्या मंत्र्यांचे मोठे वक्तव्य, काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी 10 जण इच्छुक, त्यामुळे…

ajit-pawar-nana-patole

मुंबई : Ajit Pawar NCP On Congress | आगामी विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातच काँग्रेसने राज्यातील सर्वच्या सर्व २८८ मतदारसंघातील इच्छुकांकडून अर्ज मागविल्याने मविआसह (Mahavikas Aghadi) राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, प्रदेश काँग्रेसच्या या निर्णयावर अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील (Minister Anil Patil) यांनी मोठा दावा केला आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

अनिल पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षामध्ये मुख्यमंत्री पदासाठी कमीत कमी १० जण इच्छुक आहेत. त्यामुळे काँग्रेसला २८८ जागा लढवल्याशिवाय पर्याय नाही. फक्त शिवसेना ठाकरे गटाचा (Shivsena UBT) एक मुखवटा पुढे करण्यात येत असल्यामुळे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ सुरु झाली आहे. काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली वाढलेल्या आहेत.

अनिल पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षाला वाटते की, शिवसेना ठाकरे गट किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट (Sharad Pawar NCP) हे दोनही पक्ष आपल्याला धोका देऊ शकतात. त्यामुळे आपला पक्ष एकटा पडण्याची शक्यता आहे. अशी चर्चा काँग्रेसच्याच काही नेत्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे आज काँग्रेसने सर्व जागांची तयारी केली आहे.

तर मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) अनिल पाटील म्हणाले, मनोज जरांगे यांना कोणीही रोखू शकत नाही. मुळामध्ये मराठा समाजाला जे आरक्षण द्यायचे ते दिले आहे. सगेसोयरे बाबत सरकारही सकारात्मक आहे. मात्र, प्रक्रियेसाठी काही कालावधी लागतो. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील प्रयत्नशील आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar Vs Sharad Pawar | पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला लवकरच धक्का,
माजी महापौरांसह 15 ते 20 नगरसेवक ‘या’ मुहूर्तावर वाजवणार तुतारी!

Pimpri Chinchwad Cyber Cell | पिंपरी : कर्ज फेडण्यासाठी दिघीतील व्यक्तीला अडीच कोटींचा गंडा,
सायबर पोलिसांनी गुजरातमधून आवळल्या मुसक्या (Video)