Ajit Pawar NCP Sabha In Baramati | लोकसभा निवडणुकीत लोकसभा पराभव झालेल्या बारामतीत अजित पवार गटाची भव्य सभा होणार

बारामती : Ajit Pawar NCP Sabha In Baramati | बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar) यांचा पराभव केला. त्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर (Rajya Sabha) घेऊन खासदार बनवण्यात आले. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून सर्वच पक्षांची तयारी सुरु झाल्याचे दिसत आहे. बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा (Pawar Vs Pawar) वाद निर्माण झाला आहे.
अजित पवारांनी भाजपाशी हातमिळवणी करीत सत्तेत सहभागी होऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश त्यांना मिळाले नाही. आता विधानसभा निवडणुकीची तयारी अजित पवार गटाकडूनही सुरु झालेली आहे. लोकसभेत पराभव झालेल्या बारामतीमध्ये अजित पवार गटाकडून १४ जुलै ला मोठी सभा घेण्यात येणार आहे.
याबाबतची माहिती अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिली आहे. आजच्या बैठकीत १४ जुलै दुपारी १:०० वाजता अभूतपूर्व जाहीर सभा घेण्यात येणार असल्याचा निर्णय घोषित करण्यात आला. या जाहीर सभेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तीन गॅस मोफत देण्याची योजना, शेतकऱ्यांच्या वीज माफीची योजना, तरुण-तरुणींना १० हजार रुपये स्टायपंड देण्याची योजना, सोयाबीन व कापूस उत्पादकांना ५ हजार रुपये देण्याची योजना अशा ज्या वेगवेगळ्या योजना सरकारने जाहीर केलेल्या आहेत. त्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मार्फत जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत असे सुनील तटकरे यांनी सांगितले. (Ajit Pawar NCP Sabha In Baramati)
तटकरे पुढे म्हणाले की, ” “मागील आठवड्यात पक्षाच्या विविध सेल, जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी यांची दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेतल्या. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूकीला सामोरे जाण्यासंदर्भात जनतेचे मत काय आहे हे जाणून घेतले. महायुती सरकारचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. या अर्थसंकल्पाचे मोठया प्रमाणात स्वागत करण्यात आले. आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार आहोत. याची जाणीव मनात ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता काम करणार आहे,” असे तटकरे यांनी सांगितले.
दरम्यान, उद्या सकाळी ९ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वजण अजित पवार
यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यालयात एकत्र जमणार आहेत.
आज राष्ट्रवादी काँग्रेसची अत्यंत महत्वाची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार,
राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे,
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह सर्व मंत्री, आमदार, प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Hit & Run Case | पुणे हिट अँड रन: ऑनड्युटी असलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना उडवलं,
एकाचा मृत्यू तर एक गंभीर
Rain In Lonavala Khandala | लोणावळा, खंडाळ्यात संततधार; पाऊस, धुके अन् पर्यटकांची गर्दी
Sharad Pawar On Devendra Fadnavis | “फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला पण आता…”
शरद पवारांचे मोठे विधान