Ajit Pawar NCP Social Media | अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सोशल मीडियावर बोलबाला; नवनवीन व्हिडिओ, आकर्षक प्रचार गाण्यांनी वाढवली रंगत (Videos)

Ajit Pawar NCP Social Media

मुंबई : Ajit Pawar NCP Social Media | राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी शेतकऱ्यांसाठीच्या बळीराजा वीज सवलत योजनेची माहिती देणारा एक व्हिडिओ त्यांच्या एक्स या सोशल मीडिया माध्यमावर पोस्ट केला आहे. शेतकऱ्यांना रात्री वीज पुरवली जायची, ज्यामुळे रात्री- अपरात्री पीकांना पाणी देण्यासाठी त्यांना शेतात जावं लागे. यावेळी, वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची भीती असायची. महिला आपल्या पतीची, मुलांची ते शेतात गेल्यानंतर काळजी करत, वाट पाहत ताटकळत राहायच्या. आता शेतकऱ्यांसह त्यांच्या कुटुंबांची या त्रासातून मुक्तता झाली आहे. (Mukhya Mantri Baliraja Vij Savlat Yojana)

https://www.facebook.com/policenama/videos/1045611577096930

ग्लोबल वॉर्मिंगचे (Global Warming) दुष्परिणाम शेती क्षेत्रावर झाल्यानं त्याचा फटका शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. सरकारचा (Mahayuti Govt) अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध प्रश्नांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीसाठी बळीराजा वीज सवलत योजना घोषित केली होती. या योजनेद्वारे महायुती सरकारनं शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवण्यासाह त्यांच्यावर येणाऱ्या वीजबिलाचा भार उचलण्याचं ठरवलं आहे. राज्यातील 44 लाख 6 हजार शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाणार आहे. यासाठी 14 हजार 761 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

https://www.instagram.com/reel/C_uWzLbpLmb/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

बळीराजा वीज सवलत योजनेची (Provides Free Electricity To Farmers) माहिती देणारा व्हिडिओ उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेअर करत शेतकऱ्यांप्रती असलेली त्यांची बांधीलकी स्पष्ट केली आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना “जगाचा पोशिंदा माझा बळीराजा आहे. तो आपला अन्नदाता आहे. तो काळ्या मातीत घाम गाळतो, शेती करतो तेव्हा आपल्या सर्वांच्या घरी अन्नधान्याची कमतरता भासत नाही. तो जगला तर आपण सगळेच जगलो. त्यामुळे माझ्या शेतकऱ्यांना सुगीचे दिवस यावेत याकरिता आवश्यक ती सर्व पावलं उचलण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. जसं की पीक विमा योजना आणि वीज बिल माफी!” असं अजित पवारांनी लिहीलं आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vande Bharat Express | पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे सोमवारी लोकार्पण; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
यांची माहिती, सोमवारपासून पुणे-कोल्हापूर-हुबळी फेऱ्यांना सुरुवात

Mahayuti News | ‘महायुतीत स्थानिक पातळीवर अजूनही कार्यकर्त्यांची मनं जुळलेली नाहीत’,राष्ट्रवादीच्या
बड्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – “ज्यांच्या बरोबर संघर्ष केला…”

Ajit Pawar At Narayanpur | उपमुख्यंत्री अजित पवार यांनी नारायणपूर येथे जाऊन वाहिली;
श्रीसदगुरु नारायण महाराजांना भावपूर्ण आदरांजली

You may have missed