Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Sharad-Pawar-Ajit-pawar

पुणे: Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत इन्कमिंग वाढत आहे. अजित पवार गटातील अनेक नेते घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान काल एका बड्या नेत्याने मोदीबागेत (Modibaug Pune) शरद पवारांची भेट घेतली. ( Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP)

https://www.instagram.com/p/DA5O7vSp5Jn

या भेटीनंतर सुप्रिया सुळेंच्या (Supriya Sule) गाडीतून एक व्यक्ती फाईलच्या आडून चेहरा झाकून जाताना दिसली. त्यावरून ही व्यक्ती कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. दरम्यान हा नेता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शिंगणे हे अजित पवारांची साथ सोडत तुतारी हातात घेणार असल्याची चर्चा आहे.

https://www.instagram.com/p/DA5NGFMpQRd

राजेंद्र शिंगणे हे सिंदखेडराजा मतदारसंघाचे (Sindkhed Raja Assembly Constituency) आमदार आहेत. अलीकडेच झालेल्या कार्यक्रमात त्यांनी आपण नाईलाजाने अजित पवारांसोबत गेल्याचे म्हणत शरद पवारांची स्तुती केली होती. आयुष्यभर शरद पवार यांचा ऋणी राहणार असून त्यांनी नेहमीच सहकार्य केले असल्याचेही शिंगणे यांनी म्हंटले होते.

https://www.instagram.com/p/DA5T-bap9Lv

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | वंचित कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांची आघाडी

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीने विधानसभेची रणनीती बदलली; हरियाणा निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार; काँग्रेस बॅकफूटवर?

Kothrud Pune Accident News | मिक्सरची धडक बसून रस्ता ओलांडणार्‍या तरुणीचा मृत्यु ! कोथरुडमधील बसस्टँडसमोरील घटना (Video)

You may have missed